बांदा गोगटे वाळके कॉलेजात २७ जुलैला एक दिवसीय कार्यशाळा…
बांदा
येथील गोगटे वाळके कॉलेज बांदाच्या पाडगावकर रिसर्च सेंटरच्या वतीने नेट सेट परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या परीक्षार्थींच्यासाठी “नेट सेट परीक्षेला सामोरे जाताना” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा गुरुवार २७ जुलैला आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर यांनी दिली.
पाडगावकर रिसर्च सेंटरच्या मार्फत विविध संशोधनात्मक उपक्रमांबरोबरच शैक्षणिकही उपक्रमही राबवले जातात. त्यातीलच हा एक उपक्रम आहे .या कार्यशाळेत दिवसभर नेट सेटचा पेपर क्रमांक १ व पेपर क्रमांक २ यावर विषयतज्ज्ञ सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. विविध सत्रांच्या माध्यमातून पेपर क्रमांक १ वर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. ही प्रात्यक्षिक स्वरूपातील कार्यशाळा असून काही घटकांचे सविस्तर विवेचन करत शिबिरार्थीकडून पेपर सोडवून घेतले जाणार आहेत. ही कार्यशाळा सदर दिवशी ८:.४० ते ४.:३०या कालावधीत संपन्न होईल. या कार्यशाळेची आगाऊ नाव नोंदणी संबंधितांनी करावी. मर्यादित ४० परीक्षार्थींना या कार्यशाळेत प्रवेश दिला जाईल. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली असून भोजन, कार्यशाळा विषयक साहित्य, प्रमाणपत्र आदीसाठी नोंदणी फी २५० रुपये आहे. तरी ज्यांना या कार्यशाळेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी या कार्यशाळेच्या अधिक माहिती बाबत व नाव नोंदणीसाठी कार्यशाळेचे सहसमन्वयक प्रा. एन. पी. आरोंदेकर ९७६४४२७२२० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पाडगावकर रिसर्च सेंटर, बांदाचे समन्वयक प्रा. डाॅ. एन डी. कार्वेकर यांनी केले आहे.