You are currently viewing रोटरी क्लब मालवणचा सन २०२३- २४ संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न

रोटरी क्लब मालवणचा सन २०२३- २४ संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न

मालवण :

 

रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या रोटरी क्लब मालवणचा सन २०२३- २४ या वर्षासाठी निवड केलेल्या संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा रविवारी रात्री मामा वारेरकर नाट्यगृह मालवण येथे भव्यदिव्य अश्या दिमाखदार सोहळ्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी नूतन अध्यक्ष अभय कदम, सचिव संदेश पवार व खजिनदार श्रीकृष्ण उर्फ बाळू तारी यासह नूतन संचालक मंडळास रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै यांच्या हस्ते पदाची सूत्रे सोपविण्यात आली.

सोहळ्याच्या अष्टपैलू कलानिकेतन मालवण व कलांकुर ग्रुप मालवण यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. यावेळी नव्या संचालक मंडळातील उपाध्यक्ष विठ्ठल साळगांवकर, सहसचिव ऋषीकेश पेणकर, माजी अध्यक्ष रतन पांगे, क्लब सर्व्हिस डॉ. लिना लिमये, कम्युनिटी सर्व्हिस उमेश सांगोडकर, व्होकेशनल सर्व्हिस महादेव पाटकर, इंटरनॅशनल सर्व्हिस प्रदिप जोशी, युथ सर्व्हिस तनिष्का कासवकर, रोटरी फाऊंडेशन डॉ. अजित लिमये, मेंबरशिप डेव्हलपमेंट प्रो. अनिल देसाई, क्लब अॅडमिन प्रो. प्रसन्नकुमार मयेकर, क्लब बुलेटिन प्रो. सुविधा तिनईकर, सार्जंट ऍट आर्म्स प्रो. रंजन तांबे, स्पोर्टस चेअरमन पंकज पेडणेकर, क्लब ट्रेनर सुहास ओरसकर, लिटरसी प्रमोशन प्रो. उज्ज्वला सामंत, डायरेक्टर पोलिओ प्लस डॉ. अच्युत सोमवंशी, क्लब फेलोशिप अमरजीत वनकुद्रे यांनाही पदभार सोपविण्यात आला.यावेळी व्यासपिठावर पदग्रहण अधिकारी रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै, माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. राजन देशपांडे, असिस्टंट गव्हर्नर सचिन गावडे, संजय पुनाळेकर, राजन बोभाटे, गव्हर्नर को- ऑर्डीनेटर प्रणय तेली, माजी अध्यक्ष रतन पांगे, माजी खजिनदार रमाकांत वाक्कर आदी उपस्थित होते.

रोटरी क्लब मालवणच्या आजपर्यंतच्या अध्यक्षांचा व संस्थापक सदस्यांचा सन्मान करण्यात आला. रोटरी सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला. तसेच रोटरीतर्फे मालवण मधील गरजू १६ विद्यार्थी व विद्यार्थिनींना सायकल वाटप व दोन गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप, कोळंब शाळेला सिलिंग फॅन, व एका महाविद्यालयीन मुलीस आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. यासह समाजाभिमुख अश्या उल्लेखनीय कार्यासाठी गणेश तांडेल, सदानंद टाककर, जेरोन फर्नांडिस, दिपक भोगटे, प्रताप बागवे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सुहास ओरसकर यांना सर्वोत्तम रोटरियन म्हणून यावेळी गौरविण्यात आले.रोटरीयन हे समाजाची सेवा करण्यासाठीच असून रोटरी प्रत्येकाला नेतृत्व करण्याची आणि चांगले काम करण्याची संधी देते, असे यावेळी शरद पै यांनी सांगितले. राजन देशपांडे यांनीही विचार मांडले. नूतन अध्यक्ष अभय कदम यांनी मालवण रोटरीच्या रौप्य महोत्सवी वर्षात अध्यक्ष म्हणून माझ्यावर सोपविलेली जबाबदारी आपण वारिष्ठांच्या मार्गदर्शन नाखाली व सहकारी यांच्या सहकार्याने पार पाडू, असे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. लीना लिमये व प्रसन्नकुमार मयेकर यांनी केले. यावेळी मालवणसह जिल्हाभरातील रोटरी क्लबचे पदाधिकारी, मालवणचे विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आदी उपास्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा