*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*खरे वारकरी*
*आम्ही शाळकरी*
ही रोजचीच वारी
शाळा पंढरपुरी !
अभ्यास नामी दंग
याच पंढरपूरी ||१||
बाल वारकरी हे
रोज वारी करिती |
गुरु विठ्ठल माय
ज्ञान दान करिती ||२||
विश्व असे कोडे हे
गुरु सोपे करिती |
चक्रव्यूह भेदाचे
मार्ग सोपे करिती ||३||
विठ्ठल वारकरी
एकरुप जे होती |
अभ्यासरत खरे
चिरंजीव ते होती ||४||
कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे
फणसखोल, आसोली, ता. :- वेंगुर्ला, जि. :-
सिंधुदुर्ग, राज्य :- महाराष्ट्र.