You are currently viewing मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमसावंत भोंसले विजयी.

मुंबई विद्यापीठ अधिसभा (सिनेट) सदस्यांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमसावंत भोंसले विजयी.

संस्थेचे कार्यकारी विश्वस्त व सावंतवाडी संस्थांनचे युवराज
लखमसावंत भोंसले यांची मुंबई विद्यापीठ अधिसभेवर सदस्य पदी अभिनंदनीय निवड.

सावंतवाडी

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवर व्यवस्थापक प्रतिनिधींच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये आमच्या मंडळाचे कार्यकारी विश्वस्त व सावंतवाडी संस्थांनचे युवराज लखमसावंत भोंसले यांची खुल्या प्रवर्गातून निवड झालेली आहे. पुढील पाच वर्ष ते मुंबई विद्यापीठ अधिसभेवर काम करणार आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या वित्तीय अंदाज करिता व अर्थसंकल्पीय विनियोजना करिता हे महत्त्वाचे प्राधिकरण असल्याने विद्यापीठाच्या भविष्यातील विविध शैक्षणिक योजनाकरितांचे त्यांचे मत हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. याचा निश्चितच फायदा मुंबई विद्यापीठाच्या अनेक शैक्षणिक योजनांकरिता होणार आहे पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही फार मोठी उपलब्दी ठरली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर युवराज लखमसावंत भोसले यांची निवड झाल्याने त्यांचे संस्थेचे सभासद, हितचिंतक, आणि सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा