वेंगुर्ला :
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले शहर शिवसेनेतर्फे मंगळवार दि. 18 जुलै रोजी खुल्या हाँलीबाँल स्पर्धा, औषधी व सावली देणाऱ्या वनस्पतींची लागवड आणि श्री. केसरकर यांना दिर्घायुष्य व चांगले आरोग्य लाभावे यासाठी मंदिरात लघुरुद्र असे महत्त्वपुर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात दि. 18 जुलै रोजी आयोजित केलेल्या खुल्या व्हाँलीबाँल स्पर्धा या वेंगुर्ले कँम्प येथील वेंगुर्ला हायस्कूल नजीकच्या मैदानावर होणार आहेत. या स्पर्धेचे उदघाटन सकाळी 8:30 वाजता होणार आहे. यामध्ये वेंगुर्ला, सावंतवाडी, फोंडा, रत्नागिरी, गोवा येथील एकूण 20 निमंत्रीत संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्यास रोख रुपये 10 हजार व उपविजेत्यास रोख रुपये 7 हजार आणि कायमस्वरूपी आकर्षक चषक, तसेच अन्य आकर्षक बक्षिसे वितरीत केली जाणार आहेत. सकाळी 9 वाजता शहरातील जि.प. शाळा नं. 4 आणि वेंगुर्ले कँम्प भागात रस्त्याच्या दुतर्फा औषधी व सावली देणाऱ्या कडूनिंब व बदाम झाडांचे वृक्षारोपण मान्यवरांचे हस्ते केले जाणार आहे. तर सकाळी 10 ते 12 यावेळेत वेंगुर्ले नगर परीषद भाजी मंडईतील शेकडो वर्षाच्या हनुमान मंदिरात दिपक केसरकर यांना चांगले आरोग्य व दिर्घायुष्य लाभण्यासाठी लघुरुद्र पुरोहितांमार्फत केला जाणार असून उपस्थित सर्व नागरिकांना गोड पदार्थांचे प्रसाद म्हणून वाटप केले जाणार आहे.
वेंगुर्ले शहर शिवसेनेतर्फे मंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी व क्रीडा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ले शहर शिवसेना प्रमुख उमेश येरम व सचिन वालावलकर यांनी केले आहे.