*शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे कणकवलीत देतील तो उमेदवार निवडून आणायचा-आ.भास्कर जाधव*
*आ.भास्कर जाधव यांनी घेतली कणकवली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक*
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे जो उमेदवार देतील तो उमेदवार निवडून आणायचा आहे. त्यासाठी प्रत्येकाने आतापासून कामाला लागा.प्रत्येक शिवसेना पदाधिकाऱ्याने जबाबदारी वाटून घ्या. शिवसेना संघटना वाढीसाठी प्रत्येकाने मेहनत घेतली पाहिजे. आणि संघटनेत शिस्त बाळगली पाहिजे. सर्वांनी एकदिलाने काम केल्यास कणकवलीत आमदार निवडून येणे कठीण नाही. कणकवली मतदारसंघात शिवसेना संघटना मजबूत आहे. कार्यकर्त्यांमध्येही लढण्याची धमक आहे. फक्त लढ म्हणण्याची गरज आहे. त्यासाठी योग्य उमेदवार पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे देतील असे शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना संगितले.
कणकवली- वैभववाडी-देवगड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आज कणकवली विजय भवन येथे शिवसेना नेते,आमदार भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत,अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, कणकवली विधानसभा प्रमुख सचिन सावंत,तालुका प्रमुख शैलेश भोगले,तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, हर्षद गावडे, शहरप्रमुख उमेश वाळके, प्रमोद मसुरकर,उत्तम लोके,राजू राणे, राजू रावराणे, बंडू ठाकूर, मंगेश सावंत, भालचंद्र दळवी,गोट्या कोळसुलकर,चंदू परब,
देवगड येथील तालुका प्रमुख मिलिंद साटम,तालुका प्रमुख जयेश नर, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, नगरसेवक बुवा तारी,नगरसेवक विशाल मांजरेकर, महिला तालुका प्रमुख हर्षा ठाकूर, रवींद्र जोगल, अनिल साळगावकर, राजू तावडे, संदीप डोळकर,फरीद काझी,रामा राणे, सुनील तेली, सुनील जाधव, प्रफुल्ल कनेरकर
वैभववाडी येथील उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके,स्वप्नील धुरी,दिव्या पाचकुटे,विलास नावळे आदी उपस्थित होते.