You are currently viewing अबिद नाईक यांच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरुन अजितदादांना मानणारा एक गट नाराज..!

अबिद नाईक यांच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरुन अजितदादांना मानणारा एक गट नाराज..!

अजित पवारांना समर्थन देणारे ते पदाधिकारी तटस्थ

 

सिंधुदुर्गात नाराoज गटाची जोरदार चर्चा ; नाराज गटाच्या भुमिकेकडे राजकीय पक्षांचे लक्ष..

 

सिंधुदुर्ग :

राष्ट्रवादी चे नेते अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांचा एक गट सोबत घेऊन शिंदे – भाजप सरकार ला पाठिंबा दिला.आणि सत्तेत सहभागी झाले.त्यानंतर अजित दादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनंतर राष्ट्रवादी पक्षातुन विविध पक्षात प्रवेश केलेले बडे नेते पुन्हा अजितदादा सोबत स्वगृही परत येण्यास इच्छुक होते.दरम्यान अजितदादांसोबत येण्यासाठी गाठी भेटी सुरु होत्या.पण मधल्या काळात अजितदादा पवार गटाच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी अबिद नाईक यांची निवड झाली असल्यामुळे पून्हा स्वगृही अजितदादा सोबत येणारे बडे पदाधिकारी नाराज झाले आहेत.

अजितदादा पवार यांनी शिंदे – भाजप सरकार सोबत राष्ट्रवादी पक्षातील आमदारांना सोबत घेऊन आपल्या गटाचा पाठिंबा दिला.आणि सत्तेत सहभागी झाले.आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा गट आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा गट असे दोन गट राष्ट्रवादी पक्षात पडले.आणी अजित पवार यांनी आपल्या गटाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्ष म्हणून अबिद नाईक यांची नियुक्ती केली. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मोठा गट अबिद नाईक यांच्या निवडीमुळे नाराज झाला आहे. त्या नाराज गटाच्या नाराजीची चर्चा मात्र जिल्ह्यात जोरदार सुरु आहे.. नाराज गटातील एक जबाबदार पदाधिकारी नाराज असल्याने या गटाच्या भुमिकेकडे विविध राजकीय पक्षांतील नेत्यांचे त्यांच्या हालचाली कडे लक्ष लागले आहे.याची चर्चा मात्र नाक्या – नाक्यावर आणि विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयात सुरु आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा