हात चलाखी केल्याने निल्याचे बादशहाने फोडले डोके *प्रकरण तिथेच दफातफा
*संवादच्या बातमीनंतर हलवलेली बैठक गोव्यात*
संवाद मीडियाच्या बातमीनंतर कणकवली परिसरात सुरू असणारी जुगारची बैठक बस ड्रायव्हर असलेल्या मोर्जेच्या निल्याने गोवा येथील तोरसे परिसरात हलवली होती. जुगाराच्या बैठकीचा म्होरक्या निल्या हा जुगाराच्या खेळात हात चलाखी करून पाने बदलण्यात माहीर आहे. पान बदलून फसवाफसवी करताना रंगेहाथ पकडल्याने बादशाह नामक जुगारी व्यक्तीने निल्यावर खुर्ची मारून डोके फोडण्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
काल रात्री जुगाराची बैठक रंगल्या नंतर नेहमीप्रमाणे नील्याने खालचे पान काढून चलाखी केली आणि त्यामुळे इतर खेळी मात्र भिकारी झाले. ही गोष्ट बादशाहच्या लक्षात आली होती. परंतु बैठक संपल्यानंतर खेळीना एन्ट्री(दिली जाणारी ठराविक रक्कम) दिली गेली आणि पहाटे रमीचा खेळ सुरू झाला. रमीच्या खेळात देखील मोरजेच्या निल्याने पुन्हा हातचलाखी केली आणि ही गोष्ट बादशाहच्या नजरेत आली. दुसऱ्यांदा फसवाफसवी केल्याने काही समजण्याच्या आत बादशाह ने खुर्ची उचलून निल्याच्या डोक्यात घातली. रक्तबंबाळ झालेल्या निल्याला बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सरकारी रुग्णालयात दाखल झाल्याने पोलीस तक्रार होणार होती. परंतु पोलीस तक्रार दिल्यास मारण्याची धमकी दिली गेल्याने प्रकरण तिथेच रफादफा केले गेले.
डोक्याला मलमपट्टी करून नंतर जुगाराचा जिल्ह्यातील आणखी एक म्होरक्या म्हणजे दात पडक्या आप्पा बामण याच्या गाडीतून नील्याला कणकवली येथे नेण्यात आले. या बैठकीला सिंधुदुर्गातील “कु”र”मा” या नामांकित जुगाऱ्यासह कुडाळ, कणकवली येथील मोठमोठे जुगारी आले होते. जुगाराच्या अवैध्य व्यवसायातून दारू, अफू, गांजा आदी विक्री होत असल्याचे ऐकिवात येत असतानाच आता एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत जुगार्यांची मजल गेल्याने भविष्यात अवैध्य धंद्यातून खून पडल्यास आश्चर्य वाटू नये.