You are currently viewing मोती तलावात पडलेल्या महिलेला जीवदान

मोती तलावात पडलेल्या महिलेला जीवदान

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी दाखवले प्रसंगावधान

सावंतवाडी

सावंतवाडीतील मोती तलावात पडल्याने झाडाच्या फांदीला पकडून जीव वाचवण्यासाठी हात उंचावून मदतीसाठी हाक देणारी महिला मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना दिसून आली. नागरिकांनी प्रसंग ओळखून धाव घेत तलावातील होडीच्या सहाय्याने तिला पाण्यातून बाहेर काढून तिचा जीव वाचवला. माजी नगरसेवक सुरेश भोगटे, अजय मांजरेकर, संजय म्हापसेकर, रवी मडगावकर, प्रल्हाद तावडे, सुनील राऊळ तसेच पोलीस कर्मचारी प्रवीण वालावलकर, नाईक व जगदीश दूधवडकर आदी नागरिक या मदतकार्यात सहभागी झाले होते. तिला पाण्यातून वर काढल्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. सदर महिला खासकीलवाडा परिसरातील असल्याचे समजते. नागरिकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे एका महिलेचे प्राण वाचले.

प्रतिक्रिया व्यक्त करा