*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री पुष्पा सदाकाळ लिखित कामिनी एकादशी निमित्त अप्रतिम काव्यरचना*
*सावळ्या विठ्ठला…*
भाव मनात दाटला
विठू पापणीत साठला,
चंद्रभागेच्या वाळवंटी
वैष्णव टाळ-मृदुंगी नाचला
.रूप सावळे पाहून
मन जाते गं भरून
साखर हरीनामाची वाटता .
नाचे मेघराजा आनंदून
संसार करता करता
नाम विठ्ठल चिंतिते
सुखदुःखांच्या फुलांनी
पुष्पगुच्छ नात्यांचा विणिते
माझे माहेर पंढरी
आहे स्वर्गाहुनी सुंदरी,
युगे अठ्ठावीस भक्तांसाठी
विठू उभाच विटेवरी
गळा शोभे तुळशीमाळा
भाळी गंध केशर टिळा
भक्तीसी प्रसन्न देव
घनश्याम सुंदर सावळा
टाळ चिपळ्यांचा निनादात
बीज विठ्ठल विठ्ठल पेरीते,,
कल्पांतरीचे सुख अंतरी
वारी पंढरीची करीते
वारी आषाढीची करता
मन आनंदे गं भरीन,,
चंद्रभागेत डुंबता डुंबता
प्रतिबिंब सावळ्याचे पाहीन..
माझ्या माऊलीची आळंदी
बा विठ्ठलाची ती पंढरी,
व्हावी भेट वेळोवेळा
एवढीच आस अंतरी….
…
सौ पुष्पा सदाकाळ भोसरी पुणे.
9011659747
*संवाद मीडिया*
*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.
Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.
• Duration : 4.5 Years
*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
संपर्क:
*9145623747 / 9420156771 / 7887561247*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/101911/
————————————————