कुडाळ
गुरांच्या मागे धावतांना पाय निसरुन डबक्यात पडल्याने आठ वर्षीय शालेय मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना माणगाव – कांदुळी ता.कुडाळ येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. ओमकार हनुमंत शेटकर असे मुलांचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, ओमकार हा इयत्ता तिसरी मध्ये तेथीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत होता नेहमीप्रमाणे आज शाळा सुटल्यावर तो घरी आला. यावेळी घराशेजारी मामाने सोडलेल्या गुराकडे तो गेला. यावेळी गुरे धावत असल्याने त्यांच्या मागे धावतांना पाय निसरुन तेथीलतच डबक्यात तो पडला. बराच वेळ झाल्यानंतर ओमकार कुठे दिसत नाही म्हणून मामाने शोधाशोध केली असता ओमकार डबक्यात बुडत असल्याचे दिसून आले. त्याने याबाबतची कल्पना आजूबाजूच्या ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन डबक्यात उतरत त्याला बाहेर काढले.लागलीच उपचाराकरिता त्याला सावंतवाडी उपजिल्हा हलविले असता. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी अंतिम त्याला मृत्त घोषित करण्यात आले.
ओंकार याचे कुटुंब शेतकरी वर्गातील असल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला ओमकार याच्या पश्चात आई तीन बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे सदर घटनेची कल्पना मिळतात ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती. दरम्यान याबाबत येथील पोलीस ठाण्यात भरतीची नोंद करण्यात आली असून शून्य नंबर नेते कुडाळ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार आहे असे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितले.