आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत घणाघाती टीका
कणकवली
छत्रपतींच्या विरोधात जाऊन मोगलांना जो मदत करत होता तो सूर्याजी पिसाळ आज संजय राऊतच्या रूपाने जन्माला आला आहे.
राऊत याने शिवसेनेच्या विरोधात जी भूमिका निभावली तीच भूमिका पिसाळ ने छत्रपतींच्या विरोधात निभावली होती. अशी टीका भाजप नेते आमदार नितेश राणे संजय राऊत यांच्यावर केली.राऊत च्या मालकाचे दोन्ही मुलगे वाया गेलेले आहेत. एक दारू पिताना दिसला तर दुसऱ्यावर खुनाचे आरोप आहेत म्हणून उद्धव ठाकरे फ्रस्ट्रेशन मध्ये आहेत.अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.
कणकवली येथे ओमगणेश निवासस्थानी आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत घेवून जोरदार टीका केली ते म्हणाले,कलंकित राजकारणावर बोलताना तुमच्या फॅक्टरीत शेणाची खान आहे. त्याची माहिती पण द्या.असे सांगताना आमदार नितेश राणे म्हणले कलंकित असलेला तुझ्या मालकाचा मुलगा तुला कलंकित वाटत नाही का ? त्या मालकाच्या मुलावर भ्रष्टाचाराचे महिलेच्या खुनाचे, छळाचे गुन्हे दाखल आहेत याचा कलंक तू कसा पुसणार ? असाच सवालही केला
उद्धव कलंकीत ठाकरे हे नाव आता तयार झाले आहे.याची लाज वाटली पाहिजे.झाकीर चे नाव घेताना तुला लाज वाटली पाहिजे.कलंकित लोकांच्या आणि नातेवाईक यांच्या सोबत तुझा मालक वाढदिवस साजरे करतो.अशा पाटणकर,सरदेसाई, यांचा कलंक पुसण्याची हिम्मत तुझ्यात आहे काय ? नवाब मलिक बाबत तुझं थोबाड उघडलं नाही.
दाऊद सोबत नवाब ने व्यवहार करून पडमविभूषण पुरस्कार मिळवला आहे का ? देशाच्या विरुद्ध गद्दारी करणारा, नवाब मलिक चा राजीनामा सुद्धा घेतला नाही. त्यांच्या नातेवाईकां सोबत बिर्याणी खाल्ली .सत्तेसाठी तुझा मालक आणि कुटुंब किती कलंकित झाले आहेत हे यावरून दिसते.
बॉक्स
सुळे गटाचे दुकानाची आता पानपट्टी झाली
जातीय वाद आणि धर्मभेद हे कोणी निर्माण केली हे आव्हाड विसरले आहेत.आधी खरी राष्ट्रवादी कोणती हे सांगावं मग त्यांना जातीयवाद दाखवू.आमचं काय सुरू आहे हे पाहण्यापेक्षा जितेंद्र आव्हाड यांचं दुकान बंद झालं याची चिंता करावी. कारण सुळे गट म्हणजे मॉल दुकान असे राहिले नाही तर पानपट्टी झाली आहे. कुडाळ मध्ये जे लोक राष्ट्रवादी म्हणून होते ते येत्या काही दिवसात अजित दादा पवार यांचे स्वागत करताना दिसतील.तृतीयपंथी समाजाने माझं वाक्य व्यवस्थित ऐकले नसेल आदरणीय बाळासाहेबांचं जाहीर सेभेतील स्टेटमेंट आहे. तेच मी सांगितले आहे.
बॉक्स
*डीएड, बीएड बेरोजगारांना शिक्षक सेवक म्हणून संधी देण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार*
प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा प्रश्न सोडवताना स्थानिक डीएड, बीएड बेरोजगारांना शिक्षक सेवक म्हणून संधी देणे गरजेचे आहे. निवृत्त शिक्षक यांच्या वयोमानानुसार अनेक अडचणी असू शकतात आणि त्यामुळे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी प्रत्यक्ष भेट घेऊन तशी मागणी करणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितले.