You are currently viewing जि. प. ची बांदा-निमजगा येथील शाळा धोकादायक; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

जि. प. ची बांदा-निमजगा येथील शाळा धोकादायक; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

आठ दिवसात काम सुरू करू;  विस्तार अधिकाऱ्याचे आश्वासन

बांदा

निमजगा येथील जिल्हा परिषदेची शाळा मोडकळीस आली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे तालुका अल्पसंख्यांक उपाध्यक्ष रियाज खान यांनी पालकांसह जावून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. हे तात्काळ काम सुरू न झाल्यास, आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. मात्र ८ दिवसात काम सुरू करणार असल्याचे आश्वासन विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर व केंद्रप्रमुख संदीप गवस यांनी दिले आहे.

निमजगा पूर्ण प्राथमिक शाळेत सद्यास्थितीत ४० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या मुख्य इमारतीचे छप्पर व इमारत हि जीर्ण झाल्याने ठिकठिकाणी मोडकळीस आली आहे. अनेक ठिकाणी कौलारू छप्पर कोसळले आहे. शाळेच्या मधल्या सुट्टीत मुले याठिकाणी खेळत असल्याने इमारत कोसळून दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न खान यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच लवकरात लवकर शाळेचे काम न केल्यास शाळा बंद करण्याचा इशारा दिला. यावेळी निवेदन देण्यात आले.

यावेळी मंथन गवस, संजय आईर, अमोल धुरी, रामदास सावंत, राजा खान, धर्मा राठोड, बाबुराव शेटकर, मोहसीन खान, उमेश शेटकर, सुभाष नाईक, संदेश उरूमकर, मुख्याध्यापक प्राजक्ता राऊळ आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा