*साहित्यात समाजाचे प्रतिबिंब उमटले पाहिजे.*
– कवी राजेंद्र सोमवंशी
साहित्य हे समाजाचा आरसा आहे असं मानलं जातं आणि म्हणूनच कवी, लेखक वगैरे साहित्यिकांच्या साहित्यात समाजाचे प्रतिबिंब उमटले पाहिजे. साहित्यिकाने समाजाचा आवाज होणं गरजेचं आहे. असे विचार आपल्या अध्यक्षीय मनोगतात सुप्रसिद्ध बालकवी राजेंद्र सोमवंशी यांनी व्यक्त केले. कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय सिडको यांच्यावतीने आयोजित कविवर्य नारायण सुर्वे कविकट्टा च्या मासिक खुल्या काव्य संमेलनाच्या कार्यक्रमात काव्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
यावेळी कवयित्री, लेखिका सौ. सुशीला संकलेचा यांनी संपादित केलेल्या भारतीय जवान श्री शिवशंकर चिकटे यांच्याप्रती कृतज्ञता असलेल्या १०८ लेखांची
“भावफुलांची ओंजळ” या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक प्रा डॉ. यशवंतराव पाटील यांच्या शुभहस्ते व कवी राजेंद्र सोमवंशी, लोककवी रविकांत शार्दूल, विडंबनकार संजय आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी यशवंतराव पाटील सरांनी उपस्थित कवी मंडळी मोलाचं मार्गदर्शन केले तर सुशिला संकलेचा यांनी संपादित केलेल्या पुस्तक निर्मिती संबंधित संकल्पना आणि सखोल विवेचन केले.
कविवर्य नारायण सुर्वे कविकट्टा यांच्या या मासिक खुल्या काव्य संमेलनात सुप्रसिद्ध गझलकार प्रा. राज शेळके, कवी डॉ. चिदानंद फाळके, बालसाहित्यिक संजय गोराडे, कवयित्री वैजयंती सिन्नरकर, कवी नंदकिशोर ठोंबरे, गझलकार गोरख पालवे, गझलकार अजय बिरारी, गझलकार प्रा. निशांत गुरु, युवा कवी माणिकराव गोडसे, सुभाष उमरकर, जेष्ठ साहित्यिक विलास गोडसे, डॉ. प्रशांत आंबरे, प्रा. सुभाष शेलार, प्रा. संदीप पगारे, प्रा. यु. के. आहिरे, कवयित्री शुभांगी माळी, सीमाराणी बागुल, अर्चना नावरकर, कवी गोकुळ वाडेकर, शुभम मोरे, प्रा. कृष्णा शहाणे, राजू रसाळ, संपादक तान्हाजी खोडे, शिवाजीराव सानप, डॉ. सुधीर संकलेचा, डॉ. कल्पना संकलेचा, सारिका मंडलिक, अनिल सानप, हर्षल पाटील, सार्थक शहाणे, आदी कवी, साहित्यिक, रसिकश्रोते, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी सम्मेलनाध्यक्ष बालकवी राजेंद्र सोमवंशी यांनी सादर केलेल्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंच्या कवितेने सर्वजण भावूक झाले. तर विडंबनकार संजय आहेर, गझलकार निशांत गुरु, कवी गोरख पालवे, प्रा राजेश्वर शेळके यांच्या रचनांना सर्वांनी टाळ्यांच्या गजरात विशेष दाद दिली.
या काव्य संमेलनाचे सुंदर असे नियोजन समन्वयक लोककवी रविकांत शार्दूल, कवी सत्यजित पाटील, विडंबनकार संजय आहेर यांनी केले. तर कवी नारायण सुर्वे वाचनालयाचे कर्मचारी विलास नलावडे, सुधाकर देशमुख, वगैरे यांनी यासाठी मोलाचे सहकार्य केले. तर या संपूर्ण कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन विडंबनकार कवी संजय आहेर यांनी करत सुमारे तीन तास सर्वांनाच खिळवून ठेवले होते. रविकांत शार्दूल यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक व शेवटी उपस्थित प्रमुख मान्यवरांसह गझलकार, कवी, श्रोते वगैरे उपस्थित यांचे आभार मानले.
*संवाद मीडिया*
*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.
Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.
• Duration : 4.5 Years
*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
संपर्क:
*9145623747 / 9420156771 / 7887561247*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/101911/
————————————————