You are currently viewing खानोली येथे विद्युतीकरणासाठी ५ लाखाचा निधी मंजूर

खानोली येथे विद्युतीकरणासाठी ५ लाखाचा निधी मंजूर

जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ

 

वेंगुर्ला :

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून खानोली ग्रामपंचायत परीसरात विद्युतीकरणासाठी ५ लाखाचा निधी मंजूर झाला असून या कामाचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. वेंगुर्ले तालुक्यातील आडेली जि.प.मतदार संघातील खानोली गावच्या सरपंचा सौ.प्रणाली खानोलकर व उपसरपंच सुभाष खानोलकर , सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच महेश प्रभुखानोलकर व संजु प्रभु यांच्या पाठपुराव्यामुळे खानोली गावाला विद्युतीकरणासाठी नारायण राणे यांनी खासदार निधी मंजूर केला .त्यामुळे दुर्गम असलेल्या भागात विद्युतीकरण होणार असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा