You are currently viewing संविता आश्रम व दिविजा वृध्दाश्रमास केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

संविता आश्रम व दिविजा वृध्दाश्रमास केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

संविता आश्रम व दिविजा वृध्दाश्रमास केले जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

उद्योजक राजू मानकर यांनी जपली सामाजिक बांधिलकी

कणकवली

कणकवली शहरातील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते राजू मानकर यांनी सामाजिक बांधिलकीतून पणदूर येथील संविता आश्रमाला व असलदे येथील स्वस्तिक फाउंडेशन चे दिविजा वृध्दाश्रम येथे जीवनावश्यक साहित्य तर रा. बा. उचले जि. प. शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू तसेच खाऊ वाटप केले.

यावेळी उद्योजक राजू मानकर, पत्नी शिल्पा मानकर,मुली तनुश्री मानकर,वैष्णवी मानकर,स्वाती काणेकर,शिवप्रसाद पेडणेकर मित्रमंडळ अध्यक्ष शिवप्रसाद पेडणेकर,सतीश पेडणेकर, इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर बाळा कामतेकर,युवा उद्योजक प्रथमेश चव्हाण,सोहम वाळके, अनिकेत उचले, नेत्रा पेडणेकर,प्रदीप साटम दिविजा वृद्धाश्रमचे व्यवस्थापक
संदेश शेट्ये तसेच कर्मचारी वृंद
वृद्धाश्रमातील आजी आजोबा उपस्थीत होते.
दीविजा वृद्धाश्रम येथे
शिवप्रसाद पेडणेकर देवगड या मंडळाकडून मानकर यांचा वृद्ध व्यक्तींच्या समवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना श्री. पेडणेकर म्हणाले, हे मंडळ क्रीडा सांस्कृतिक आरोग्य तसेच शैक्षणिक उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत मदत करत असते. आपल्या लोकांसाठी आपणच पुढे येत मदतीचा हात दिला पाहिजे.असे उद्गार त्यांनी काढले.
उद्योजक राजू मानकर म्हणाले,
आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून गेली काही वर्षे समाजातील अनाथ, वृद्धाश्रमांतील वृद्धांना, आर्थिक परिस्थिती नसलेल्या विद्यार्थ्याना शैक्षणिक वस्तू देत मदत करत असतो. समाजातील दानशूर व्यक्तींनी देखील सामाजिक बांधिलकीतून दीन दुबळ्यांना मदत केली पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांनी या मदतीचा योग्य उपयोग करून चांगले शिक्षण घेत आपल्या शहराचे नाव उज्वल केले पाहिजे.

प्रतिक्रिया व्यक्त करा