*अमित सामंत पुस्तके उशाला घेऊन झोपत नाहीत तर झोपेचे सोंग घेऊन कांगावा करणाऱ्यांची झोप उडवतात हे लक्षात ठेवा – रुपेश जाधव जिल्हा चिटणीस*
२०१९ पासून आपणं कुठल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेत सक्रिय होता फक्त नेते आले की मागून धावायचे प्रसिद्ध करायची नेते गेले की पून्हा दूसरे नेते येईपर्यंत आपण भूमिगत असे आपले संघटनात्मक काम गेली चार वर्षे सुरू आहे आणि हे संपूर्ण जिल्हा उघड्या डोळ्यांनी पाहत होता, जिल्ह्यात संघटनात्मक काम गेल्या चार वर्षांत कुठे आणि कसले केले ते अबिद नाईक यांनी जाहीर करावे, पवार घराण्याची निष्ठा सांगता अरे वा काय निष्ठा? शरद पवार साहेबांच्या घरावर हल्ला, प्रदेशाध्यक्ष यांना ईडीची नोटीस निलेश राणे यांनी पवार साहेब यांच्या वर केलेली अश्लील टिप्पणी,याचा संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रात निषेध आंदोलने होत होती त्यावेळी आपण कुठल्या बिळात लपला होता, कोणाबरोबर फोटो सेशन करत दंग होता,यांची जंत्री आमच्या कडे आहे, अमित सामंत निवडून येण्याची पात्रता नाही असे जर आपणास वाटत असेल तर आपली कणकवली तालुक्यात पात्रता होती तर नगरपंचायत निवडणुकीत पक्षाचे पॅनल का उतरले नाही, एकटेच का उभे राहिला,जर संघटना मजबूत होती तर एकाच सिटवर का थांबला,कारण पॅनल उतरण्याची ऐपत नव्हती म्हणून फक्त आपल्या पुरताच विचार केला आणि कुणाच्या जीवावर निवडून आलात हे सर्वांना माहीत आहे, म्हणून मंगळसूत्र एकाचे कुंकू दुसऱ्याचे आणि नांदायला तिसरा अशी अवस्था असणाऱ्या अबिद नाईक यांनी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यावर टिका करणे हास्यास्पद आहे,
संघटनेत दुफळी निर्माण करण्याचे कार्य गेली चार वर्षे सुरू होती,याचे उदाहरण सभासद नोंदणी प्रक्रिया जिल्हा स्तरावरुन होते हे सर्वश्रुत असताना आपण परस्पर प्रदेश कार्यालयातून पुस्तके आणून सभासद नोंदणी केली असे म्हणता मग आपली सभासद नोंदणी जिल्हा कार्यालयात नाही मग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आपण पक्षाचे सभासद नाही हे सत्य सांगितले तर मिर्ची का झोंबली,
गेल्या चार वर्षांत ज्या एक दोन सोम्या गोम्याना घेऊन प्रदेश स्तरावर तक्रारी करून जिल्हाध्यक्ष पद मिळविण्यात जेवढा वेळ वाया घालवला तो वेळ जर संघटना बळकटी साठी वापरला असता तर पवार कुटुंबीयांवर श्रद्धा आहे असे निदर्शनास आले असते पण फक्त जिल्हाध्यक्ष पदाच्या हव्यासापोटी संघटना मोडीत काढण्याचा प्रयत्न गेली चार वर्षे करत होता,हे संपूर्ण जिल्ह्याने पाहीले आहे, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी हे उपद्व्याप केले नसते तर पवार घराण्याशी एकनिष्ठ संबोधले असते,पण आपण दुफळी निर्माण करायची आणि खापर दुसऱ्यावर फोडायचे ही वृत्ती सोडा आता आपण अजित पवार यांच्या गटात सक्रिय झाला आहात तिथे तरी नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे पाय खेचण्याचे उद्योग बंद करा, यापुढे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या विरोधात आवाज उठवला तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ आपली निरर्थक बडबड यापुढे खपवून घेतले जाणार नाही असा सज्जड इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस रूपेश जाधव यांनी दिला आहे,