You are currently viewing ०८ जुलै २०२३ रोजी राज्यस्तरीय स्वच्छता सर्वेक्षण समितीने केले ग्रामपंचायत सडुरे शिराळेचे परीक्षण

०८ जुलै २०२३ रोजी राज्यस्तरीय स्वच्छता सर्वेक्षण समितीने केले ग्रामपंचायत सडुरे शिराळेचे परीक्षण

*०८ जुलै २०२३ रोजी राज्यस्तरीय स्वच्छता सर्वेक्षण समितीने केले ग्रामपंचायत सडुरे शिराळेचे परीक्षण*

*समितीच्या बैठकीत स्वागत समारंभ वेळी ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी केलेले “चला खेडे गावाला” स्वच्छता अभियान राबवायला हे एक पात्री नाटक ठरले लक्षवेधी*

*वैभववाडी-*

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मधून राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्यातील 15 पंधरा ग्रामपंचायतींची निवड केली त्यात 15 मध्ये वैभववाडी तालुक्यातून एकमेव सडूरे शिराळे ग्रामपंचायत ची निवड झाली होती. या पार्श्वभूमीवर 08 जुलै 2023 रोजी राज्यस्तरीय स्वच्छता सर्वेक्षण समितीने केले ग्रामपंचायत सडुरे शिराळेचे परीक्षण करण्यात आले. गावात ठिकठिकाणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केल्यावर ग्रामपंचायत कार्यालयात या समितीची आढावा बैठक संपन्न झाली. या आढावा बैठकीत संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची उद्घाटन झाले. उपस्थित मान्यवरांना सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभहस्ते सोनचाफा आणि काजूचे झाडे भेट स्वरूपी देऊन स्वागत केले. या स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले ते ग्रामपंचायत सदस्य नवलराज विजयसिंह काळे यांनी केलेल्या एकपात्री नाटकाचे. सरपंच व कार्यकारणीच्या मान्यतेने करण्यात आलेले हे एक पात्री नाटकाचे खुद्द नवलराज काळे यांनी लेखन केल असून संपूर्ण एकपात्री नाटकाचे कलाकार म्हणून नवलराज काळे यांनी काम पाहिले. दिग्दर्शक,लेखक,निर्माते, कलाकार श्री नवलराज विजयसिंह काळे प्रस्तुत *”चला खेडे गावाला”* स्वच्छता अभियान राबवायला या एकपात्री नाटकात खेडेगावात राहणाऱ्या एक शेतकरी आपल्या पत्नीच्या हट्टापायी आपल्या सर्व कुटुंब सहित सुखी संसार टाकून शहराकडे जात असे. शहराकडे गेल्यावरती पैसा अडका बक्कळ मिळतो. पण तो शेतकरी व्यसनाधीन होतो गावात राहून कमी कमवायाचा कमी खर्च करायचा आणि खाऊन पिऊन सुखी राहायचा. परंतु शहराकडे गेला बक्कळ पैसा कमवून बायकोचे हट्ट पुरवले बरेच दिवसांनी त्याला वाईट संगतीन मुळे आणि हातात बक्कळ पैसा आल्यामुळे दारूचे व्यसन लागते. रोज घरी दारू पिऊन यायचा आणि आपल्या बायकोला मारझोड करायचा रोज घरात भांडण असे त्यातून त्याची तब्येतही खराब होत चालली होती. या सर्व गोष्टीला कंटाळून बायको माझा पहिला संसार छान होता मी उगाचच शहराला आले आता मी काय करू असं म्हणत मोठमोठ्याने रडू लागते तेवढ्यात दरवाजावर वासुदेव येतात आणि तिला तिची व्यथा विचारतात आणि तिला संदेश देतात की तू पुन्हा तुझ्या गावी जा सर्व काही ठीक होईल त्या ठिकाणीच तुझा संसार सुखाचा होईल. हे ऐकताच ती पुन्हा आपल्या पतीला गावाकडे जाण्याचे विनंती करते आणि तब्बल दहा वर्षानंतर हा शेतकरी पुन्हा एकदा आपल्या गावी येतो परंतु गावात येतात त्याच्याकडे व्यसनाधीन झाल्यामुळे पैसा उरत नाही गावाकडचं घर पडतं सर्व काही उध्वस्त झालेला असत गावाकडची शेती गावाकडचं घर, सोन्यासारखी बैल विकलेले असतात सध्या त्याच्या हातामध्ये काहीच नसत अशाच वेळी त्याचा एक मित्र त्याला ग्रामपंचायत सडूरे शिराळे च्या ग्रामसभेमध्ये घेऊन जातो ग्रामसभेत तो आपली व्यथा मांडतो त्यावर ग्रामपंचायत मध्ये होणारे अमुलाग्र बदल ग्रामपंचायतीने राबवलेले स्वच्छता बघून तो प्रसन्न होतो आणि आपली व्यथा ग्रामसभेमध्ये मांडतो. व्यथा ऐकल्यानंतर ग्रामपंचायत कार्यकारणी व ग्रामसेवक म्हणतात आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्यास दहा वर्षांपूर्वीचे घर कोसळले असते ते घर ग्रामपंचायतीकडून उभा करण्याकरिता घरकुल योजनेचा किंवा घर दुरुस्ती प्रस्ताव करून लाभ देऊ शौचालय बांधणे आणि घरा लगत शोष खड्डा मारणे, बायोगॅस बांधून घे सहकार्य करू, नाबार्डचा खत प्रकल्प कर त्यासाठी सहकार्य करू, घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचवू, घरापर्यंत शेतीपर्यंत रस्ते ही देऊ, शेतात शेततळे बांधण्याकरिता अर्थसहाय्य देऊ, शेतामधी शेट पाट बांधण्यासाठी सुद्धा सहकार्य होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व राज्य सरकार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यास पेन्शन योजना या पेन्शनचा लाभ त्याला मिळवून देण्याकरिता कार्यकारणी कटिबद्ध आहे. राजा सर्जा बदल्यात जिल्हा बँकेतून कर्ज योजना काढून चार म्हैसी घे दुधाचा व्यवसाय चालू कर शेत नांगरण्यासाठी कृषी विभागाकडून तुला पॉवर ट्रेलर उपलब्ध करून मिळेल, असलेला सातबारा वरती आवश्यक ठिकाणी काजू लागवड फळ झाडे लागवड साठी एमआरजीएस मधून तुला झाडे उपलब्ध मिळतील. गावात श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट उपलब्ध आहे त्याच्या माध्यमातून तुझ्या मुलाचा एक वर्षाचा शैक्षणिक खर्च आम्ही उचलतो, गावात पोस्ट ऑफिस आहे तिथे तुझं बँक अकाउंट काढ तिथे जीवन विमा आहे ते काढण्यास सहकार्य मिळेल. घरात स्वच्छता साठी लागणारे सगळे साहित्य ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्याला मिळेल आम्ही ते देतोय, गावात साधना बचत गट कार्यरत आहे त्या बचत गटात वहिनींचे नाव टाकून घ्या तुम्हाला व्यवसायासाठी कुक्कुटपालन व इतर घरगुती व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून मिळेल. हे सर्व झाल्यानंतर तुला आमच्या गावातील कचरा गाडीवरती काम मिळेल. गावाच्या सिमे पासून ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत स्वच्छतेचे प्रकल्प आम्ही कशा प्रकारे केले ते तू पाहिले आहेस आत्ता कार्यालयापासून पुढील उर्वरित गावाची स्वच्छता व त्यासाठी राबवलेले प्रकल्प पाहायचे असतील तर हे समदे समोर बसलेले स्वच्छता सर्वेक्षण अभियान 2023 साठीचे अधिकारी साहेब स्वच्छता विषयक केलेली कामे व प्रकल्प पाहायला इथे आले आहेत. आपण त्यांच्यासोबत राहिलेल्या गावाची पाहणी करूया… मग येतोस ना,.. शेतकरी म्हणाला हो येतो पण या तुम्ही मला देणार असलेल्या समद्या योजना मला कधी मिळणार सरकारी काम आणि वर्षभर थांब अशी गत असतीया त्यावर ग्रामपंचायत सदस्य यांनी त्यांना उत्तर दिले आपल्याकडे उत्तम काम होते आम्ही कार्यकारणी सक्षम काम करूच परंतु आमच्या ग्रामपंचायतला लाभलेले ग्रामसेवक प्रशांत जाधव असतील वैभववाडी तालुका पंचायत गटविकास अधिकारी जयप्रकाश परब,विस्तार अधिकारी हंडेराव साहेब असतील कृषी विस्तार अधिकारी प्रकाश अडुळकर असतील ते तर सोडच आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर साहेब ते तर आमच्या गावात येऊन गेले गाव बघून गेलेत फिरायला पिकनिक साठी आले नव्हते तर या गावाला काहीतरी देण्याकरिता गावाच्या सुविधा वाढवण्याकरता आले होते त्याचे लक्ष आपल्या गावावरती हाय आणि गावातील इतर कर्मचारी अधिकारी वर्ग सुद्धा तेवढ्या तत्परतेने काम करतोय आणि देशात आणि राज्यात सुद्धा काम करणाऱ्यांचे राज्य आहे त्यामुळे एक वर्ष थांबायची काय गरज नाय थोडं कड काड तोपर्यंत ही माझ्याकडं आर्थिक मदत घे आणि तुझा संसार पुन्हा नव्याने उभा कर. बरोबर लय उपकार झाले तुमच्या माझा मोडलेला संसार तुम्ही उभा करून दिलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे असे म्हणत जनतेला खेडेगाव सोडून न जाण्याचा संदेश दिला शहराकडे न जाता गावातच राहून आपला सर्वांगीण विकास होऊ शकतो या ठिकाणी राबवत असलेल्या स्वच्छता अभियानात आपण सर्वांनी भाग घेऊन आपला आरोग्य आपला परिसर स्वच्छ ठेवण्याकरिता एक पाऊल पुढे यावं असा आवाहन या कार्यक्रमाच्या माध्यमातून असंख्य पात्रांच्या भूमिकेत जाऊन शेवटी एका शेतकऱ्याच्या रूपाने ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी गावातील जनतेला स्वच्छतेचा आणि गावात राहण्याचा संदेश दिला. तसेच ग्रामपंचायत इथून विविध योजना राबवल्या जातात त्या जनतेसाठी राबवल्या जातात या संपूर्ण कामांचा आढावा या एकपात्री नाटकातून उपस्थित मान्यवरांना देण्यात आला. यावेळी स्वच्छता अभियान सर्वेक्षण समितीच्या गावाचा संपूर्ण आढावा ग्रामसेवक प्रशांत जाधव,सरपंच,उपसरपंच सदस्य यांच्याकडून घेण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत ग्रामसेवक जाधव यांनी संपूर्ण गावाची माहिती अतिशय उत्तम प्रकारे उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. संपूर्ण गावाची पाहणी झाल्यावर सत्कार समारंभाच्या कार्यक्रमा वेळी आढावा बैठकीत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित अधिकारी संपूर्ण कार्यक्रमावर आनंदित होऊन ग्रामपंचायतच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या एकपात्री नाटकातून बरेचसे काही घेण्यासारखा आहे अशा प्रकारची जनजागृती ग्रामपंचायत सदस्यांकडून जर होत असेल तर निश्चितपणाने येणाऱ्या काळात गाव उज्वल भविष्याकडे जाईल यातील मात्र शंका नाही अशा प्रकारचे उद्गार काढत श्री काळे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. या कार्यक्रमाला श्री विजय पाटील जिल्हा कार्यक्रम व्यवस्था कोल्हापूर, श्री अभिषेक पाटील माहिती शिक्षण संवाद तज्ञ कोल्हापूर, श्री संतोष घाडगे, स्वच्छता तज्ञ कोल्हापूर, त्यांच्यासोबत जिल्ह्यातून आलेले श्री संतोष पाटील जिल्हा स्वच्छता अधिकारी, संतोष पवार जिल्हा स्वच्छता अधिकारी,वैभववाडी पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री हांडे, गावचे सरपंच दीपक चव्हाण ग्रामसेवक प्रशांत जाधव उपसरपंच आनंद जंगम ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, ग्रामपंचायत सदस्य विलास जंगम, ग्रामपंचायत सदस्या रोशनी बाणे, ग्रामपंचायत सदस्या दीक्षा रावराणे, माजी पोलीस पाटील प्रकाश रावराणे, सर्व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कांबळे सर, कुवर सर, भैराळे सर,अंगणवाडी सेविका सौ भावना सावंत, जागृती रावराणे,ग्रामपंचायतचे कर्मचारी सुनील राऊत, पाणी कर्मचारी अशोक पाटील, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार सेवक सागर मेजारी, कोतवाल मोहन जंगम, मंगेश चव्हाण, केशव रावराणे लंकेश जंगम व इतर शासकीय निमशासकीय कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक प्रशांत जाधव यांनी केले.

 

*संवाद मिडिया*

*पाहिजेत… पाहिजेत… पाहिजेत…*🏃‍♂️🏃‍♂️

*सावंतवाडी येथील श्रीराम बोअरवेलमध्ये इलेक्ट्रिक कामासाठी अनुभवी आणि शिकाऊ कामगार पाहिजे*

*पगार श्रेणी : १००००/- ते १२०००/-*

*📲 7775921004 / 8668794431*

*Advt link*
https://sanwadmedia.com/102468/
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा