You are currently viewing नेहमी असं वाटायचं

नेहमी असं वाटायचं

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

*नेहमी असं वाटायचं*

असं वाटायचं
नेहमीच पडतं घेतो
समजून असतो
इतरांना…..

आपल्यालाही कोणी
घ्यावं कधी समजून
यावं उमजून
मन…..

आशा आकांक्षा
जेव्हा होतात विफल
समजून चल
जीवन…..

सुख जवापाडे
दुःख असते पर्वताएवढे
आयुष्यात तिढे
सोडवायचे….

असं वाटायचं
परिश्रमाने होऊ यशस्वी
वाट फसवी
निघायची…….

तोडू चांदण्या
आभाळाचा चढू घाट
नाव अफाट
मिळवू……

वाटलेलं सारं
मनात तसंच उरलं
आयुष्य सरलं
अपेक्षेत……..!!

🌿🍂🌿🍂🍂🌿🍂🌿
अरुणा दुद्दलवार@✍️

 

*संवाद मीडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

संपर्क:
*9145623747 / 9420156771 / 7887561247*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/101911/
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा