गावचे सुपुत्र योगेश लाड व प्रसाद जंगम यांनी दिले साहित्य!
शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांनी मानले आभार!
कणकवली
साकेडी गावचे सुपुत्र योगेश लाड व प्रसाद जंगम यांनी NSDL कंपनीच्या सीएसआर फंडातून साकेडी शाळा नं 1 च्या 49 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य सुपुर्द केले. या शाळेतून अनेक पिढ्या घडल्या. जुन्या काळात या शाळेत प्रतिकुल परिस्थिती शिक्षकांनी शिक्षण दिले. त्या साकेडीतील शाळेत येऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू देण्याचे भाग्य लाभले यामुळे जीवन सत्कारणी लागले असे मनोगत योगेश लाड यांनी यावेळी व्यक्त केले. श्री. जंगम यांनीही मुलांना शुभेच्छा दिल्या. संजय शिरसाट यांनी योगेश लाड यांना साकेडी शाळेचे नाव सुचविले त्याबद्दल त्यांचेही शाळेने आभार मानले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन अध्यक्ष विनोद जाधव, जानवली केंद्राचे केंद्रप्रमुख के. एम. पवार, बांधकाम विभाग निवृत्त स्थापत्य अभियंता भिकाजी तेली, शाळेच्या मुख्याध्यापिका समिधा वारंग ,श्री. पावसकर, श्री.मोरे, श्रीम.सावंत,मुले व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. वारंग यांनी केले. आभार श्री. पावसकर तर सूत्रसंचालन श्री. मोरे यांनी केले.