You are currently viewing आंबोली-बेळगाव राज्य मार्गावर माडखोल येथे कोसळले झाड; वाहतूक ठप्प

आंबोली-बेळगाव राज्य मार्गावर माडखोल येथे कोसळले झाड; वाहतूक ठप्प

सावंतवाडी

आंबोली-बेळगाव राज्य मार्गावर माडखोल येथे भले मोठे झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना आज अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच त्या ठिकाणी ड्युटी बजावत असलेले वाहतूक पोलीस विलास नर व त्यांचे सहकारी दाखल झाले आहेत. ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावर कोसळलेले झाड दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा