वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुक्यातील खानोली , वायंगणी, मातोंड व पेंडूर या चार ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत प्रभाग निहाय जाहीर झालेले आरक्षण खालीलप्रमाणे : ‘ *ग्रामपंचायत खानोली* ‘ : एकूण सदस्य संख्या ७, प्रभाग १ घोगळवाडी, देऊळवाडी, पश्चिम देऊळवाडा, सावंतवाडा, धनगरवाडी यासाठी सदस्य संख्या ३ असून येथे सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण असे आरक्षण आहे. प्रभाग २ कातर्र्णीचे भाटले, घोलेकरवाडी, हरिजनवाडी देऊळवाडी पूर्व सदस्य संख्या २ असून येथे ना.मा.प्र. व सर्वसाधारण स्त्री असे आरक्षण आहे. प्रभाग ३ आंबेस्वाडी सदस्य संख्या २ असून येथे सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण असे आरक्षण आहे.
‘ *मातोंड ग्रामपंचायत* ‘: एकूण सदस्य संख्या ९, प्रभाग १ सावंतवाडा भरभरेवाडी, गंडाची राई खालचे बांबर, मधलावाडा तळेवाडी या भागासाठी सदस्य संख्या ३ असून येथे सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण असे आरक्षण आहे. प्रभाग २ वरचे बांबर, न्हावीवाडी, नाटेली, हरिजनवाडी गावठण या भागासाठी सदस्य संख्या ३ असून येथे ना.मा.प्र., सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण असे आरक्षण आहे. प्रभाग ३ मडवाडी, गोवळवाडी, बामणाचे टेंब, सुकळीवाडी, मिरिस्तेवाडी, काजीरमळा या भागासाठी सदस्य संख्या ३ असून अनुसूचित जाती स्त्री, ना.मा.प्र. स्त्री. व सर्वसाधारण असे आरक्षण आहे.
‘ *ग्रामपंचायत् वायंगणी* : एकूण सदस्य संख्या ९, प्रभाग १ बागायतवाडी, कांबळीवाडी, साळगावकरवाडी हुलमेखवाडी, नांदोस्करवाडी, पोयंडीवाडी, डोंबवाडी, कोचरेकरवाडी सदस्य संख्या ३ असून येथे ना.मा. प्र.स्त्री., सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण असे आरक्षण आहे. प्रभाग २ नाईकवाडी, कामतवाडी, धोंडवाडी, पंडितवाडी,नांदरुखवाडी, कोंडुसवाडी सदस्य संख्या ३ असून येथे ना. मा. प्र., सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण असे आरक्षण आहे. प्रभाग ३ मोरवावाडी, आवेरानिवतीवाडी, सुरंगपाणी, आवेरा सावंतवाडा, आवेरा सातारडेकरवाडी, आवेरा नाईकधोंडवाडी, आवेरा धनगरवाडी तळेवाडी या भागासाठी सदस्य संख्या ३ असून सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण असे आरक्षण आहे.
‘ *ग्रामपंचायत पेंडूर* ‘ : एकूण सदस्य संख्या ९, प्रभाग १ नेवाळेवाडी, सातवायंगणी सदस्य संख्या ३ असून येथे सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण असे आरक्षण आहे. प्रभाग २ दुकानवाडी नाईकवाडी सदस्य संख्या ३ असून ना.मा. प्र.स्त्री., सर्वसाधारण स्त्री सर्वसाधारण असे आरक्षण आहे. प्रभाग ३ पेंढऱ्याचीवाडी, खुळादेववाडी सदस्य संख्या ३ असून येथे ना.मा.प्र. सर्वसाधारण स्त्री व सर्वसाधारण असे प्रभाग निहाय आरक्षण आहे.