सावंतवाडी –
सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावासाठी गेली दीड पावणे दोन वर्ष स्वतंत्र तलाठी नव्हते. यामुळे मळगाव तलाठी म्हणून कार्यरत असलेले सचिन गोरे यांच्याकडे प्रभारी मळेवाड तलाठी म्हणून कार्यभार होता. मळेवाड तलाठी म्हणून काम करत असताना गोरे यांनी अतिशय चांगली सेवा शेतकरी व ग्रामस्थांना दिली होती. मळेवाड गावासाठी कायमस्वरूपी तलाठी मिळावा यासाठी मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्याकडे निवेदन देऊन मागणी करून पाठपुरावा केला होता. नवीन तलाठी नेमणुकीमध्ये प्रांताधिकारी पानवेकर यांनी मळेवाड कोंडुरे गावासाठी स्वतंत्र तलाठी म्हणून अनुजा भास्कर यांची नियुक्ती केली. मळेवाड तलाठी म्हणून अनुजा भास्कर या आजपासून रुजू झाल्या आहेत.
सावंतवाडी मळेवाड तलाठी सचिन गोरे यांचा मळेवाड येथे आज सत्कार करून त्याना निरोप देऊन पुढील वाटचालीसाठी गावाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मळेवाड तलाठी पदी प्रभारी म्हणून सचिन गोरे यांनी अतिशय चांगली सेवा दिल्याबद्दल सरपंच सौ मिलन पार्सेकर व उपसरपंच हेमंत मराठे यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व सुपारीच रोप देऊन सत्कार केला व गावाच्या वतीने पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर ग्रामपंचायत सदस्य स्नेहल मुळीक व ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक यांनी नव्याने नियुक्त झालेल्या मळेवाड तलाठी अनुजा भास्कर यांचा सुपारीच रोप देऊन स्वागत केलं. तलाठी म्हणून काम करत असताना सचिन गोरे यांनी शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना जी सेवा दिली त्या सेवेबद्दल गावाच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने गोरे यांचे आभार मानण्यात आले. गोरे यांनी ज्या पद्धतीने गावाला सेवा दिली त्याच पद्धतीने नव्याने नियुक्त झालेल्या अनुजा भास्कर यांनीही गावाला सेवा द्यावी अशी विनंती उपसरपंच हेमंत मराठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भास्कर यांना केली. यावेळी मोहन गावडे, सुनील नाईक, सुनील तिरोडकर, रवींद्र नाईक, प्रकाश नाईक, योगेश कारुडेकर, रमेश कारूडेकर, कृष्णा इन्सुलकर, विलास सावंत, दाजी उक्षेकर आदी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.