अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करा – खासदार विनायक राऊत
सिंधुदुर्गनगरी
महामार्गावरील होणारे अपघात कमी करण्यासाठी सर्वच यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज झाली. या बैठकीत आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, आदी उपस्थित होते.
यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. काळे यांनी अपघात आणि रस्त्यांबाबतची माहिती संगणकीय सादरीकरणातून दिली. खासदार श्री. राऊत म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रुग्णवाहिका रस्त्यांवर दिसल्या पाहिजेत.त्याची अंमल- बजवणी आजपासून करा. ज्या ज्या ठिकाणी अवैधरित्या मिडल कट करण्यात आले आहेत, ते तात्काळ बंद करा. वेग मर्यादा ओलांडणे, मद्य पिवून गाडी चालवणे यावर प्रभावीपणे कारवाई करावी. अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी सर्वांनी मिळून आवश्यक ते सर्व उपाय योजना आणि प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले.