सावंतवाडी
भारतीय जनता पार्टी अनुसूचीत जाती मोर्चा ची बैठक सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर मध्ये जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरवार दिनांक ६ जुलै रोजी आयोजित करण्यात आली.
भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन जिल्ह्यामध्ये मोर्चाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहीती दिली . तसेेच मोदी सरकारच्या ९ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल मागासवर्गीय वस्तीमध्ये जाऊन केलेल्या कार्यक्रमाची माहीती दिली .
यावेळी अनुसूचित जाती महीला मोर्चा जिल्हाध्यक्ष पदी सोनिया उमेश मठकर यांची नियुक्ती जाहीर करून जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले . यावेळी व्यासपीठावर आंबोली मंडल अध्यक्ष व जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर उपस्थित होते .
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेलींनी मार्गदर्शन करताना पक्षाच्या वाटचालीत मोर्चा व आघाडी यांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगून , यामुळे सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना न्याय मिळतो व पक्षाचे कार्य जोमाने वाढते . मोदी सरकार च्या 9 वर्षाच्या कालावधीत विविध योजनांचे अनेक लाभार्थी तयार झाले त्या लाभार्थ्यांपर्यंत संपर्क साधून ९०९०९०२०२४ हा नंबर डाईल करून मोदींना जास्तित जास्त समर्थन द्यावे असे आवाहन केले .
यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा पदाधिकारी व मंडल अध्यक्ष यांची नियुक्ती करून. मा.जिल्हा अध्यक्ष राजन तेली साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले .
यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष अनंत आसोलकर , जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव ( कणकवली ) , विधानसभा सरचिटणीस महेश गणपत चव्हाण , सोशल मिडीया वासुदेव रामचंद्र जाधव , जिल्हा चिटणीस पुंडलिक कदम , जि.का.का.सदस्य जयानंद शिरोडकर व ज्ञानेश्वर हरीजन , सावंतवाडी विधानसभा महीला उपाध्यक्षा सपना भास्कर जांभोडकर , आंबोली मंडल अध्यक्ष गुरूनाथ कासले , वेंगुर्ले अध्यक्ष बाळा मधुकर जाधव , बांदा मंडल अध्यक्ष संजय अर्जुन डींगणेकर , बांदा मंडल उपाध्यक्ष राजेश चव्हाण इत्यादींना नियुक्तीपत्र देण्यात आली .
यावेळी उपस्थित सर्वांनी 9090902024 हा नंबर मिस् काॅल देऊन मोदींना समर्थन दिले.
यावेळी या सभेला आसोली सरपंच बाळा मधुकर जाधव , डीग॔णे सरपंच..केसरी सरपंच स्नेहल कासले उपस्थित होते. तसेच अनुसूचित जाती मोर्चा कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेचे सुत्र संचालन वासुदेव रामचंद्र जाधव यांनी केले. आभार नामदेव जाधव यांनी मानले .