You are currently viewing गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी ५२ विशेष रेल्वे फेऱ्या

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी ५२ विशेष रेल्वे फेऱ्या

सिंधुदुर्ग :

 

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता कोकण रेल्वे मार्गावर आणखी ५२ विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

दिवा-चिपळूण आणि मुंबई – मंगळुरू मार्गावर या विशेष १६ रेल्वेगाड्या धावणार आहेत. यामुळे उत्सवकाळात धावणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांची एकूण संख्या २०८ वर पोहोचली आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सव काळात कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होईल.

*दिवा-चिपळूण मेमू (36 सेवा)*

13 ते 19 सप्टेंबर आणि 22 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरदरम्यान गाडी धावणार आहे. ही गाडी आठ डब्यांची असणार आहे.

01155 मेमू दिवा स्थानकातून रोज सायंकाळी 7.45 ला सुटेल आणि चिपळूणला मध्यरात्री 1.25 पोहचेल.

तर चिपळूणहून दुपारी 1 वाजता सुरू होणार असून दिवा स्थानकात ती सायंकाळी 9 वाजता पोहोचणार आहे.

गाडीचे थांबे – पनवेल, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी

*मुंबई-मंगळुरू विशेष एक्स्प्रेस (16 सेवा)*

01165 ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री 10.15 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.40 वाजता मंगळुरू येथे पोहोचेल.

तर मंगळूरूवरुन सायंकाळी 6.40 ला सुटणार असून दुपारी 1.35 वाजता एलटीटी येथे पोहोचेल. ही 20 डब्यांची गाडी असणार आहे.

गाडीचे थांबे- ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड ब्यंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरथकल आणि ठोकूर

*कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू*

कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. पावसाळ्यात प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी १० जून ते ३१ ऑक्‍टोबर या कालावधीत रेल्वेची वेगमर्यादा ४० ते ९० प्रतितास असणार आहे. त्यानुसार सर्वच गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा