You are currently viewing खेळ पावसाचा आपल्या जीवाचा (पाऊस पाणी)

खेळ पावसाचा आपल्या जीवाचा (पाऊस पाणी)

*”न्यूज स्टोरी टुडे” वेब पोर्टलचे ठाणे जिल्हा ब्युरो चीफ तथा दै.ठाणे वैभवचे स्तंभलेखक, पत्रकार, कवी ॲड. रुपेश पवार लिखित अप्रतिम लेख*

*खेळ पावसाचा आपल्या जीवाचा (पाऊस पाणी)*

उन्हाळ्यात उष्णतेचा पारा वर चढू लागतो. मे महिन्यात अखेरच्या दिवसात शरीराला उकाडा सहन होत नाही. गर्मी अचानक वाढू लागते. मग सर्व लोक, पावसाळी भक्त मोठ्या आतुरतेने पावसाची वाट बघतात पण पाऊस येता येता लांबणीवर पडतो. वादळी वाऱ्यांमुळे पावसाला काहीसा विलंब होतो. त्यामुळे आभाळ भरून येत नाही. सावळा अंधार दाटत नाही. त्याचवेळी वादळी वाऱ्यांचा तो सूर मंद होऊ लागतो.

निळ्या आकाशी मग ढग भरून येतात. आभाळ खाली झुकू लागते. सावळा अंधार दाटून येतो आणि पाऊस पाणी शिंपडल्यागत आभास निर्माण करून जातो. हळूहळू तो पाऊस जोर धरू लागतो. मंद गतीने रिमझिम पाऊस ताल धरून येतो. त्या नंतर हा संततधारेत बरसू लागतो. मग पावसाळी गार थंड वारा सर्वांना सुखद आनंद देतो. असा हा पाऊस पुढे तीन-चार महिने सतत आपल्यासोबत मित्रासारखा असतो. आपल्याला अशावेळी गरमागरम चहा, भजी, मका किंवा असे अनेक खाद्यपदार्थ पोटात घालावेस वाटतात. सर्वजण पावसाच्या सुखमय प्रवासात नाचू लागतात. ते त्यांचे नाचणे तना, मनाचे, नाद खुळे असते. कारण त्यावेळी अंतर्मन उचंबळून येते. मातीला अनामिक सुगंध दरवळू लागतो, वीज झंकारून लखाकते. अशावेळी काय करावं, काय नाही काहीच सुचत नाही.

मग अशावेळी काही मुडी लोक या चैतन्यदायी वातावरणात, पावसाळी सहलीचे बेत आखतात. नदी, धबधबे, सागरी किनारे या मंडळींना आठवू लागतात. त्यातून हे आनंदयात्री त्या ठिकाणी मनमुक्त होऊन, पावसाची मौज घेऊ लागतात पण हा आनंदाचा उत्सव साजरा करताना. हे तरुण नदीचा खळखळाट शांतपणे अनुभवत नाहीत. समुद्रावर उधाणलेल्या लाटांचे संगीत कुणीही मनात साठवून घेत नाहीत. धबधब्यांचे वाऱ्यावर उडणारे तुषार मनसोक्त चेहऱ्यावर, अंगावर घेत नाहीत. प्रत्येकाला अस वाटतं आपण नदीच्या काठी खडकावर बसून पाय पाण्यात सोडावेत. धबधब्यात अगदी मोकळे होऊन नाहून जावे. फेसाळलेल्या समुद्री लाटांसंगे खेळावे. जरा पाण्यात आत जावे. पाण्यात ओले चिंब भिजावे.

पण मित्रांनो पाऊस जरी आपला मित्र असला, तरी पाणी हे अवखळ आहे. ते आपल्याला खेचून, वाहून घेऊन जाऊ शकतं. पाण्याला आपण जीवन म्हणतो पण हे जीवन माणसाच्या जीवनाला क्षणार्धात संपवतं. आपण कित्येक वेळा वाचक म्हणून, दर्शक म्हणून दरवर्षीच्या पावसात काही दुर्घटना बघतो, वाचतो व ऐकतो. कुणीतरी पाण्याच्या प्रवाहात गेला, त्याचवेळी अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि हा हा म्हणता दोन-तीन माणसं वाहून गेली. त्यांना वाचवणारेही वाहून गेले. अशा प्रकारे त्यांचा दुर्दैवी अंत झाला. मग त्याचे फोटो, व्हिडिओ पाहून, दर पावसाळ्यात घरच्यांना सतत दुःख होत राहते. त्या आठवणीतून ते प्रियजन कधीच बाहेर येत नाहीत. कविवर्य कुसुमाग्रज यांनी आपल्या “कणा” कवितेत म्हटले आहे. गंगामाई पाहुणी आली, केली घरट्यात राहून. मग त्या पुढे कुसुमाग्रज म्हणतात, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये, पाणी थोडे ठेवले. अशी ही कुसुमाग्रज यांची गंगामाई आहे. इतका हा पाण्याचा प्रवाह खतरनाक असतो पण माणसाला आपल्या आनंदा पुढे काही दिसत नाही. स्वतःच्या जीवालाही तो धोक्यात घालतो आणि अकराळ विक्राळ प्रलयाच्या कुशीत जाऊन बसतो.

असा पावसाचा अघोरी आनंद कुणी घेऊ नका. पावसाचा आनंद घ्यायचा असेल, तर एखाद्या हिल स्टेशनवर जाऊन, मोकळ्या मैदानात पावसाच्या मनमुक्त सरी अंगावर घ्या. पाण्याचा खळखळाट जरा दुरुन अनुभवून घ्या. कारण आपले जीवन अनमोल आहे. त्या अनमोल जीवनाची जपणूक करा, जीवाशी कुणी खेळू नका. पाऊस डोंगराच्या कड्यावर आहे, डुलणाऱ्या झाडाझुडपात आहे, रानात आहे, मळ्यात आहे, कौलारू घरावर आहे, सिमेंटच्या जंगलावर आहे, पाऊस तुमच्या गावात, शहरात आहे. त्यामुळे पावसाचा आनंद घेताना हे सारं लक्षात ठेवा. मग आपल्या पावसावर प्रेम करा.

रुपेश पवार

 

*संवाद मिडिया*

🔰 *(MITM)*🔰
*मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट ओरोस, सुकळवाड*

*🧑🏻‍🎓प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!👩‍🎓*

*🎒10वी /12वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित एकमेव डिप्लोमा व अभियांत्रिकी महाविद्यालय*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्तआणि 💯 नोकरीची संधी*
*देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट डिप्लोमा व इंजिनिअरिंग कॉलेज* 👨‍🎓👩‍🎓

🧾 *उपलब्ध कोर्सेस*👇

◼️ *पदवी (इंजिनिअरिंग) अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷
♦️ *कॉम्प्युटर इंजिनिअरिंग*🖥️
♦️ *इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग*

https://sanwadmedia.com/99360/
◼️ *पदवीका (पॉलिटेक्निक)अभ्यासक्रम*

♦️ *मेकॅनिकल इंजिनिअरिंग*⚙️
♦️ *सिव्हील इंजिनिअरिंग*👷

◼️ *पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ *B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )*
✅ *B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )*

*🔻📖प्रमुख वैशिष्ट्ये📖🔻*
*👉🏻१३ वर्षांची शैक्षणिक परंपरा*

*👉🏻अनुभवी व तज्ञ प्राध्यापक*
👉🏻 *राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन*
*👉🏻उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप*
🔬🧰

*💯 👷नोकरीची संधी 👍🏻👷*

🪪👩🏻‍🎓🧑🏻‍🎓
*स्कॉलरशिप*

*EBC/ EWS/OBC* *या प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

🆓 *SC/ST/NT/SBC/VJ/DT* *या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

*🏣विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व कॅन्टीन सुविधा उपलब्ध*

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…👍📝*

*आताच भेट द्या –👇🏻*

*सुकळवाड , सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ , ता- मालवण,जिल्हा -सिंधुदुर्ग (४१६५३४)जि. सिंधुदुर्ग*

*http://www.mitm.ac.in/*

*संपर्क -*📞
*02362-299195*

*9420703550*
*9987762946*,
*9819830193*,
*9423301564*,
*9029933115*

🪪 *सुविधा केंद्र*🪪
*(MITM)*
🔰 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड मॅनेजमेंट*🔰

*FC Code-3440*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99360/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा