*दिल्लीचे प्रा.प्रशांत भाग्यवंत अमरावतीत…*
*आयएएस करणाऱ्या विद्यार्थ्यांना करणार विनामूल्य मार्गदर्शन*
अमरावती
दिल्लीचे सुप्रसिद्ध आयएएस प्रशिक्षक व अमरावतीचे सुपुत्र तसेच दिल्लीच्या गाजलेल्या मालुका आयएएस अकादमीचे प्रशिक्षक प्रा.प्रशांत भाग्यवंत हे अमरावती येथे आलेले आहेत. अमरावती जिल्ह्यातील ज्या मुलांना आय ए एस करावयाचे आहे त्यांना ते विनामूल्य मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यांच्या या मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन अमरावतीच्या डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने मिशन आयएएस अंतर्गत केले आहे .आज श्री प्रशांत भाग्यवंत यांनी अमरावतीच्या श्री शारदा विद्यालय व शांतीनिकेतन इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य स्पर्धा परीक्षांची पुस्तके वितरित केली. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे देखील दिली. महाराष्ट्रातील विद्यार्थी बहुसंख्येने प्रशासनात जावे यासाठी श्री प्रशांत भाग्यवंत कार्यरत असून त्यांनी महाराष्ट्रात ठिकाणी विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेतल्या आहेत .अमरावती शहरातील आय ए एस करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी दि.6 जुलै रोजी सकाळी दहा वाजता डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकॅडमी जिजाऊ नगर विद्यापीठ रोड महापौरांच्या बंगल्यासमोर अमरावती कॅम्प येथेआयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीचे संचालक प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे . प्रकाशनार्थ प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती 9890967003
*संवाद मीडिया*
*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.
Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये
*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*
*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.
• Duration : 4.5 Years
*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712
संपर्क:
*9145623747 / 9420156771 / 7887561247*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/101911/
————————————————