*नॅशनल इंग्लिश मिडीअम स्कूल नडगिवे येथे शेतकरी सन्मान सोहळा संपन्न*
कणकवली
आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीअम स्कूल नडगिवे येथे शेतकरी सन्मान सोहळा संपन्न झाला या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई, संस्था समन्वयक पराग शंकरदास यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी तिथवली गावचे भुमिपुत्र गुलजार काझी उपस्थित होते.हे आधुनिक पद्धतीने स्ट्रॉबेरी तसेच विविध प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेतात.यांचा प्रशालेच्या वतीने शाल,मानपत्र व तुळशीचे रोप देवून सन्मान करण्यात आला.विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी.पर्यावरण रक्षणासाठी आपली भुमिका काय असावी.भविष्यामध्ये कृषी क्षेत्रात नविन कोणकोणत्या संधी उपलबध होतील या विषयी मार्गदर्शन केले.शिक्षक प्रतिनिधी ओंकार गाडगीळ यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञाने शेती कडे वळण्यासाठी प्रोत्साहीत केले.या सोहळ्याची सांगता शाळेचे मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई यांच्या मार्गदर्शन पर भाषणाने झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता 8वी तील विद्यार्थिनी नबिहा काझी हिने केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले