You are currently viewing जि. प. मसुरे नं.१ केंद्रशाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न

जि. प. मसुरे नं.१ केंद्रशाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न

मसुरे

गुरुपौर्णिमेचा संदर्भ हा प्राचीन भारताच्या इतिहासात सापडतो. आपल्या भारतात गुरु-शिष्य परंपरेला खूप मोठी परंपरा आहे.पुराणशास्त्राच्या दाखल्यानुसार, महाभारत या महाकाव्याचे निर्माता व्यास ऋषींनी आषाढी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या शिष्यांना आणि इतर ऋषींना वेद आणि पुराणांचे ज्ञान दिलं होतं. याच दिवसाचे स्मरण म्हणून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.असे प्रतिपादन गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रप्रमुख नारायण देशमुख यांनी केले.

भारतात गुरुला ब्रम्हा, विष्णू आणि महेशाचं रुप समजलं जातं. गुरु हा साक्षात परब्रमह्म असल्याचं सांगितलं जातं. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने देशातल्या शाळांमध्ये गुरुप्रती विद्यार्थी आदर व्यक्त करतात. त्यांचे आशीर्वाद घेतात. या दिवशी शाळा,महाविद्यालयं किंवा आध्यात्मिक गुरु, कला किंवा विद्या शिकवणारे गुरु यांचं पूजन केलं जातं आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते.

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा केंद्रशाळा मसुरे नं.१ इथे बाल विद्यार्थी कडून अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.त्यावेळी मसुरे केंद्रबल गटाचे केंद्रप्रमुख नारायण देशमुख,मुख्याध्यापिका शर्वरी सावंत मँडम , गोपाळ गावडे विनोद सातार्डेकर सरा, रामेश्वरी मगर मँडम ,शिफा शेख मँडम,हेमलता दुखंडे आदी उपस्थित होते. वेद व्यास व ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमांचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तद्नंतर गुरुजनांचे पाद्यपूजन करण्यात आले. निधी पेडणेकर, गौरांग दुखंडे, लावण्या दुखंडे, काव्या फरांदे, समर्थ शिंगरे, रमेश मुळये, मीहिर मसुरकर, स्वानंदी हिंदळेकर, क्रीशा दुखंडे, लतिफा सय्यद, संकेत गोलतकर, नेहा शिंगरे, मानसी पेडणेकर आदींनी गुरु महती सांगणारी मनोगते व्यक्त केली. चैतन्य भोगले यांनी *गुरुचरणी ठेविता भाव* हा सुंदर अंभग सादर केला. मोक्षदा कातवणकर, यशस्वी कातवणकर *गुरु तात माय* हे पद सुंदररित्या सादर करून वाहवा मिळवली. इयत्ता दुसरीतील आयन शेख याने सुंदर कव्वाली सादर केली. समर्थ शिंगरे, नेहा शिंगरे, संकेत गोलतकर, रिया भोगले यांनी गुरूंची चित्रे रेखाटली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा शिंगरे व सांजवी जाधव हिने केले तर आभार सुरज मसूरकर यांनी मानले.या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.शितल मसुरकर, शिक्षण तज्ञ श्री.सन्मेष मसुरेकर, माजी सरपंच सौ.लक्ष्मी पेडणेकर यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा