You are currently viewing माड्याचीवाडी कुडाळ येथे गुरूपौर्णिमा उत्सव भक्तीपूर्ण वातावरणात साजरा…

माड्याचीवाडी कुडाळ येथे गुरूपौर्णिमा उत्सव भक्तीपूर्ण वातावरणात साजरा…

कुडाळ

माड्याचीवाडी येथे गुरुपौर्णिमा उत्सव भक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटे पाच वाजल्यापासून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. श्री स्वामी समर्थ मठ माड्याचीवाडी पहाटे अनुग्रह,श्री सत्यनारायण महापुजा ,आरती,श्री श्री 108 महंत मठाधीष परमपूज्य सद्गुरु श्री गावडे काका महाराज यांची पाद्यपूजा त्यानंतर त्यांचा गुरु संदेश आणि अखंड महाप्रसाद व दर्शन सोहळा संपूर्ण दिवसभर चालू होता.प.पू. सदगुरू श्री गावडे काका महाराज यांची पाद्य पूजा करण्याचा मान घाटकोपर मुंबई उपासना केंद्राच्या वतीने श्री व सौ प्रकाश सावंत यांना देण्यात आला होता. परमपूज्य सद्गुरु श्री गावडे काका महाराज संस्थापित श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास या संस्थेच्या वतीने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी *”मन ही एक अद्भुत शक्ती*” ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेत सहभागी झालेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीचा सन्मान प.पू सद्गुरु श्री गावडे काका महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात करा. या कार्यशाळेत 50 विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यशाळेमध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे तज्ञ मार्गदर्शक शिक्षक श्री सुहास आंबेस्कर व श्री आनंद सावंत योगशिक्षक यांचाही सन्मान श्री गावडे काका महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला. श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास ही संस्था समाज बांधिलकी जपणारी संस्था म्हणून कार्यरत आहे. या समाज बांधिलकीचा भाग म्हणुन नाग्या माध आदिवासी आश्रम वेताळ बांबार्डे निवासी कातकरी समाजाच्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप सद्गुरूंच्या हस्ते करण्यात आले. आपल्या सर्व भक्त जणांना गुरु संदेश देताना श्री श्री 108 महंत परमपूज्य सद्गुरु श्री गावडे काका महाराज म्हणाले *प्रपंच करून परमार्थ करणे म्हणजे खऱ्या अर्थाने गुरूच्या जवळ जाणं आहे. भक्तिमार्गात आपण येतो तेव्हा आपल्या आई वडिलांची कृपा असते म्हणून आपण भक्तिमार्गात राहतो. आपल्या कुलदेवतेची कृपा आपल्यावर झालेली असते. भक्तिमार्गामध्ये गुरु-शिष्याचे नातं दृढ करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्यावर आपल्या पूर्वजांच्या पूर्व पुण्याची कृपा झालेली असते. जीवनात मिळालेल्या सद्गुरूंमुळे आपल्या जीवनातला अंधकाराचा नाश आपण करू शकतो. गुरु शिष्याचे आपले प्रेम संबंध हे आपलं जीवन परिवर्तन करत असतात. गुरु शिष्याचं नातं जेव्हा दृढ होत ज्याप्रमाणे लोखंडाला परीस चिकटल्यावर सोनं होतं तसंच हे नातं दृढ होत यालाच म्हणतात गुरुकृपा झाली. गुरु शिष्याचं नातं हे नातं आदर्शवत असलं पाहिजे. आज व्यासपौर्णिमा आहे म्हणजेच गुरुपौर्णिमा आपल्या जीवनातील दोषांचे निराकरण करून आपलं जीवन सुखी कसं होईल असा आपण प्रामाणिक प्रयत्न सर्वांनी मिळून केला पाहिजे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपणाला प्रेम देता आलं पाहिजे. गुरु किंवा सद्गुरु मिळणे फार सोप आहे पण तो सद्गुरु आपल्या सोबत टिकवणे फार मोठा आहे. सद्गुरु आपल्याला बोलतो तो आपल्या सोबत आलेल्या वाईट शक्तीला बोलत असतो सद्गुरूंच्या मनामध्ये अखंड प्रेमाचा जरा वाहत असतो. सद्गुरु नी दिलेल्या उपासनेचा मार्ग भक्ति मार्गचा दिवा सदैव तेवत ठेवा म्हणजे आपलं जीवन सुंदर आणि सुखमय बनल्याशिवाय राहणार नाही. आपल्या गुरुच्या चरणी आपलं जीवन पूर्णपणे समर्पित करा जेणेकरून आपल्या जीवनाचा उद्धार होऊ शकेल. परमेश्वराच्या भक्तिमार्गातून एक ना एक दिवस असा पवित्र दिवस माझ्या जीवनामध्ये येणारच. असा द्रुढ विश्वास बाळगा. अश्या अम्रुतत्यल्य संदेशातून सदगुरूनी भक्तगणांना आशिर्वादीला.
या सोहळ्यात श्री सदगुरू भक्त सेवा न्यास धार्मीक, सामाजीक, व श्री स्वामी समर्थ श्रध्दा भक्त सेवा न्यास गोवा या तिन्ही संस्थेच्या विश्वस्थानी सदगुरूना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी अध्यक्ष एकनाथ गावडे, दत्तात्रय किनळेकर , अमीत कोरगावकर,पंकज कामत ,सौ प्रीती कुशे ,राकेश केसरकर, नामदेव गावडे राम चव्हाण , गिरीधर गावडे,गौरव मुंज, सौ अंजली पावसकर,विजय साहिल ,भास्कर गावडे ,राजन गावडे,संतोष उगवेकर, पद्मजा नाईक निरसंगकर, अक्षय नाईक श्रीकृष्ण पाटकर. बापू गांवकर. प्रकाश सावंत उपस्थित होते. प्रास्ताविक भास्कर गावडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार सचीव राकेश केसरकर यांनी मानले

प्रतिक्रिया व्यक्त करा