You are currently viewing करुळ येथे चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पोचा अपघात…

करुळ येथे चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पोचा अपघात…

वैभववाडी

चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने टेम्पो वहाळात जावून कलंडला. हा अपघात सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास करूळ जामदारवाडी नजीक घडला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. तर टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे.
सावंतवाडीहून कोल्हापूरकडे टेम्पो (नं. एमएच- १२जेएफ ७२३६) चालक घेऊन जात होता. करूळ मोरी नजीक दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करताना चालकाचा ताबा सुटून टेम्पो वहाळात कलंडला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात चालक बालबाल बचावला आहे. या घटनेची नोंद उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात करण्यात आली नव्हती.

प्रतिक्रिया व्यक्त करा