You are currently viewing गुरू महात्म्य…

गुरू महात्म्य…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री प्रा सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

गुरू महात्म्य…

 

गुरू मायबाप गुरू पुण्यवंत

गुरू सावलीत आम्ही भाग्यवंत

समवेत त्यांच्या संस्कारांचे धन

विद्युल्लता जणू गुणवंत संत …

 

घडवती माती देऊन आकार

देवाचा घडतो जणू साक्षात्कार

पुण्यवंत आत्मे गुरू भेटती जे

गुणाकार तेथे नाही भागाकार ….

 

जोडूनिया धन गुरू माऊलीचे

पान्हाळ अशा त्या प्रेम गाऊलीचे

मायबाप आद्य गुरू तो तिसरा

आवरू लागतो मायेचा पसारा…

 

गुरू चरणात वसे पहा स्वर्ग

चोखट दिसतो समोरचा मार्ग

डोळा तो तिसरा दाखवितो जग

अहंकार जावो समुळ तो गर्व …

 

ज्ञानाची कवाडे उघडी सताड

ओलांडून जाती शिष्य ते पहाड

आपुल्या सारखे करून सोडती

गुरू माऊली ती असे सडेतोड …

 

शरणच जावे गुरू माऊलीला

मुकू नये कधी तिच्या सावलीला

चुकवती फेरा जन्म मरणाचा

सोहळाच होई मग जगण्याचा…

 

 

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

दि : १ जुलै २०२३

वेळ : दुपारी १ वाजता

प्रतिक्रिया व्यक्त करा