पुढच्या वर्षी होणार दिमाखात साजरा
– नगराध्यक्ष समीर नलावडे
कणकवली
गेल्या वर्षी बाल दिनाचे औचित्य साधून कणकवली शहरातील माझ्या लहान बालगोपाळ मित्रांसाठी २० नोव्हेंबर रोजी ” एक दिवस छोट्यांचा ” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परंतु या वर्षी कोरोना या रोगाचे संकट असल्यामुळे हा कार्यक्रम करता येणार नाही, शहरातील सर्व लहान मुलांची व पालकांची नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
कोरोना आजारावर आपण सर्वांनी मात करण्यासाठी शासनाने दिलेले सर्व नियम पाळूया आणि पुढच्या वर्षी हाच कार्यक्रम मोठ्या आनंदात व दिमाखात साजरा करूया, असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी म्हटले आहे.