*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी सत्यवान घाडी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ॐ गुरुवे नमः*
वर्ण:- १२
*गुरू व्यापे सारे अवकाश*
********************
ज्ञानाचा पसरुनी सदा प्रकाश
गुरू माझा व्यापे सारे अवकाश।।धृ।।
हात पकडून शिकवी अक्षर
मुलाबाळांना करीतसे साक्षर
गोड बोलून करी अज्ञान नाश
गुरू माझा व्यापे सारे अवकाश।।धृ।।१।।
चुकलेल्या सदा गुरू दावी रस्ता
स्वजीवनी मात्र स्वत: खाई खस्ता
गुरुपाशी येता होई ना निराश
गुरू माझा व्यापे सारे अवकाश।।धृ।।२।।
गुरू माता-पिता होई मित्र कधी
सहज दूर करी चित्ताची व्याधी
शिष्यांसाठी तोडी अपुले घरपाश
गुरू माझा व्यापे सारे अवकाश।।धृ।।३।।
गुरू ब्रम्ह रूप, गुरू विष्णू रूप
महेश रूप जाणा ते दत्त रूप
त्याचे पाई लीन व्हावे सावकाश
गुरू माझा व्यापे सारे अवकाश।।धृ।।४।।
**********************************
*रचना:-* प्रा.सत्यवान शांताराम घाडी.
*गाव:-* किंजवडे, घाडीवाडी, देवगड, सिंधुदुर्ग.
*ठाणे:-* दिवा
*मो.नं.:-* ८९२८२९२२५४