भाजपा राज्य परिषद सदस्य सुरेश सावंत
कणकवली
सिंधुदुर्ग जिल्हाला कोरोना पासून वाचविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या चालक व वाहक यांचा प्रवास थांबवा, अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता पक्षाचे राज्य परिषद सदस्य सुरेश सावंत यांनी आमदार नितेश राणे यांना दिले.
मुंब्ईला सिंधुदुर्ग मधून दर पंधरा दिवसाला सुमारे चाळीस चालक आणि वाहक,प्रत्येक डेपो मधून नेले जातात. त्यामुळे सिंधुदुर्रगातील बस सेवा कोलमडली आहे. जे लोक मुंबईला गेले त्यापैकी काही चालक वाहक कोरोना पॉझिटिव्ह असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांना स्वतंत्र ठेवले जात नाहीत. आमदार बंटी पाटील यांनी कोल्हापूर येथून नेलेल्या चालक व वाहकांना जिल्ह्यामध्ये माघारी बोलावून परत न पाठविण्याचे ठरवले आहे, तरी आपण या विषयात त्वरित लक्ष घालून सिंधुदुर्गाला न्याय द्यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे राज्य परिषद सदस्य सुरेश सावंत यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे केली आहे.