You are currently viewing पी.एम.किसान योजनेसाठी लाभार्थ्यांनी ई- केवायसी पूर्ण करावे – निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे

पी.एम.किसान योजनेसाठी लाभार्थ्यांनी ई- केवायसी पूर्ण करावे – निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे

पी.एम.किसान योजनेसाठी लाभार्थ्यांनी ई- केवायसी पूर्ण करावे – निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे

सिंधुदुर्गनगरी

पी. एम. किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी ई- केवायसी प्रामाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकार आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय लाभार्थ्याना पुढील हप्ते वितरीत होणार नाहीत. सदर योजनेच्या पात्र लाभार्थी यांना ई- केवायसी करण्यासाठी OTP किंवा  Biometric हे पर्याय पी.एम.किसान  पोर्टलवर उपलब्ध करुन दिलेले आहेत. सद्या जिल्ह्यात एकूण 87 टक्के ई- केवायसी प्रामाणिकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित 13 टक्के लाभार्थ्यांनी लवकरात लवकर सर्व ई- केवायसी प्रमाणिकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

       यासाठी  pmkisang.gov.in या वेबसाईटवर Farmer Corner या ठिकाणी ई- केवायसी मध्ये आधार नंबर टाईप करून पुढे येणाऱ्या निर्देशाचे पालन करावे व ही प्रक्रिया पूर्ण करावी किंवा नजीकच्या महा- ई सेवा केंद्रामधून सदर प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. किंवा सदरची प्रक्रिया पूर्ण करुन घेणेकामी OTP किंवा Biometric या प्रचलित पध्दतीशिवाय नवीन पध्दत आली आहे. फेशियल ऑथेंटिकेशन मोबाईल अॅपद्वारे ई- केवायसी करता येईल. जे शेतकरी वयस्कर आहेत आणि त्यांचा मोबाईल क्रमांक आधारशी लिंक केलेला नाही त्यांच्यासाठी सदर ॲप उपयुक्त आहे. याद्वारे खालीलप्रमाणे प्रक्रिया करावी लागेल.

फेशियल ऑथेंटिकेशन ई-केवायसी कशी करावी

App वापरण्याची कार्यपध्दती खालीलप्रमाणे आहे.

PMKISAN Gol’ या नावाचे App गुगल प्ले-स्टोअर वर उपलब्ध आहे.  समोर दिसणाऱ्या स्क्रीनमध्ये New Farmer Registration आणि Login हे दोन पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी पी. एम. किसान योजनेतील नोंदणीकृत लाभार्थ्यानी Login या बटनावर क्लिक करावे.  स्क्रीनवर दिसणाऱ्या Login Type मध्ये Beneficiary हा पर्याय निवडावा. पी. एम. किसान Registration ld किंवा आधार क्रमांकाच्या आधारे App वर Login करण्यासाठी GET OTP बटनावर क्लिक करावे. पी. एम. किसान योजनेसाठी रजिस्टर केलेल्या मोबाईल क्रमांकावर चार अंकी OTP प्राप्त होतो, तो OTP टाकून Login करावे.  त्यानंतर पुढील स्क्रीनवर स्वतःचा सहा अंकी MPIN तयार करावा. सदर MPIN च्या माध्यमातून लाभार्थ्यास App मध्ये Login करणे तसेच e-KYC करणेसाठी उपयोग होणार आहे. ज्या Registration id किंवा आधार क्रमांकावरून App मध्ये Login केले आहे. त्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित असेल तर Your e-KYC is pending for completion” असा संदेश दिसेल, म्हणजेच त्या लाभार्थ्यांची KYC प्रलंबित आहे. समोर दिसणाऱ्या Click here to complete your e-KYC या लिंक वर क्लिक केल्यावर लाभार्थ्यांनी तयार केलेला सहा अंकी MPIN प्रविष्ठ करावा.

तद्नंतर समोर दिसणाऱ्या Consent Form का क्लिक करून Scan Face या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर समोर FaceRD App is not installed on device जसा संदेश दिसल्यास OK बटनावर क्लिक करावे. तद्नंतर गुगल प्ले स्टोअर ‘Aadhar FaceRD (Early Access) हे App install करण्यासाठी उपलब्ध होईल हे Install करावे. त्यानंतर मोबाईल मध्ये Capturing Face सुरू होईल त्यामध्ये दर्शवलेल्या सूचनाचे पालन करून Proceed या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर मोबाईल समोर धरुन चेहऱ्यावर प्रकाश दिसेल अशा पद्धतीने Sean Face या बदनावरती क्लिक करावे.त्यानंतर Images captured successfully processing असा संदेश स्किनवर आल्यानंतर Successful e-KYC असा संदेश दिसेल म्हणजेच लाभार्थ्यांचे  e-KYC पूर्ण झाले आहे. इतर KYC कराची असल्यास Dashboard वरील KYC for other beneficiaries या बटणावर क्लिक करा व  पुनश्च: वरीलप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया करावी.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा