You are currently viewing बांदा केंद्रशाळेत वृक्षारोपण व झाडांचा वाढदिवस साजरा करून कृषीदिन साजरा

बांदा केंद्रशाळेत वृक्षारोपण व झाडांचा वाढदिवस साजरा करून कृषीदिन साजरा

बांदा

निसर्गात झाडाचे मोल अनमोल आहे.शालेय वयातच विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयक जनजागृती व्हावी यासाठ जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१ शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करून व शाळेच्या परिसरात. यापूर्वी लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करून कृषीदिन साजरा करण्यात आला.
झाडे लावा, झाडे जगवा,एक मूल दोन झाडे,जिथे झाडेझुडे तिथे पाऊस पडे,जिथे पाऊस पडे तिथे झाडेझुडे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.यावेळी शाळेच्या परिसरात झाडांची रोपे लावून वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यापूर्वी शाळेच्या परिसरात लावलेल्या व विद्यार्थ्यांनी संगोपन केलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी शाळा परिसरातील झाडांचे औक्षण करून पुजन केले व शाळा परिसरात केकही कापण्यात आला.विद्यार्थांना यादिवशी गोड खीरही वाटप करण्यात आली. मावेळी मुख्याध्यपिकापक उर्मिला मोर्ये, सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, पदवीधर शिक्षिका स्नेहा घाडी स्काऊट शिक्षक जे.डी.पाटील, उपशिक्षक शांताराम असनकर, रंगनाथ परब ,रसिका मालवणकर,जागृती धुरी, शुभेच्छा सावंत,मनिषा मोरे आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा