You are currently viewing मनसेकडून दीपावलीच्या हटके शुभेच्छा; सत्ताधाऱ्यांवर निशाणा !

मनसेकडून दीपावलीच्या हटके शुभेच्छा; सत्ताधाऱ्यांवर निशाणा !

मालवण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दीपावली निमित्ताने हटके शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीच्या शुभेच्छा देताना सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने दिल्या जाणाऱ्या पोकळ आश्वासनांची त्यांनी पोलखोल केली आहे. कुडाळच्या महिला रुग्णालयाबाबत आमदार, खासदारांच्या आश्वासनांची वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली कात्रणेच उपरकर यांनी प्रसिद्ध केली आहेत. मनसेच्या या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरला आहे.
जून महिन्यात खासदार विनायक राऊत यांनी आमदार वैभव नाईक यांच्यासह कुडाळच्या जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन महिला रुग्णालयाची पाहणी केली होती. त्यावेळी तीन ते चार महिन्यांत हे हॉस्पिटल सुरू होईल, अशी माहिती त्यांनी ११ जून रोजी वृत्तपत्रातून दिली होती. त्याचप्रमाणे ९ जुलै रोजी खा. विनायक राऊत यांनी दिलेल्या माहितीत महिन्याभरात महिला रुग्णालय सुरू करण्याचे म्हटले होते. तर २२ जून रोजी दोन महिन्यांत हे महिला रुग्णालय सुरू करण्याची माहिती खा. राऊत यांनी वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली होती. ही तिन्ही कात्रणे मनसेने या जाहिरातीत प्रसिध्द केली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा