ठाणे :
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिन म्हणून एक जुलै रोजी साजरी केली जाते. या कृषी दिनाचे औचित्य साधून मुरबाड तालुक्यातील मंदार कृषी तंत्र निकेतन कोळींब
च्या वतीने विविध उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे संचालक माननीय श्री अरविंद पोटे, सौ.विजयाताई पोटे, प्राचार्य सौ मीनाक्षी शिंदे मॅडम आणि श्रीमती मनिषा मोरे मॅडम तसेच कॉलेजचे शिक्षक वृंद आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून श्रीमती मनीषा मोरे मॅडम(Preventive Health Awerness Counsilor) आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती मनीषा मोरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य आणि जैविक शेतीचे फायदे तसेच शेती हा एकविसाव्या शतकातील आधुनिक व्यवसाय म्हणून पाहण्याची गरज आहे या विषयावरती मार्गदर्शन केले. कृषी दिनाचे औचित्य साधून कॉलेजच्या वतीने वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांनी कृषी दिना विषयी उपस्थिताना मार्गदर्शन केले. सर्व मान्यवरांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आले..