You are currently viewing भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी कणकवलीत १८ तारखेला खास बैठक – नगराध्यक्ष समीर नलावडे

भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी कणकवलीत १८ तारखेला खास बैठक – नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली

कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर बुधवार ​१८ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे​ ​अकरा वाजता नगराध्यक्ष दालनात विशेष होणार आहे. या बाबतची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. काल रात्री भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ९ वर्षीय बालक जखमी झाला होता. या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.
या बैठकीत संबंधित खाते प्रमुख उपस्थित असणार आहेत. यावेळी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त बाबत काय उपाययोजना करता येतील याची चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती श्री नलावडे यांनी दिली.
शहरातील भालचंद्र महाराज संस्थान लगतच्या कांबळे गल्ली परिसरात काल रात्री नील संतोष सावंत या नऊ वर्षीय बालकावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्याच्या हातात तोंडाला कुत्र्याने चावा घेतल्याने या परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली होती. यापूर्वी देखील कांबळी गल्ली परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत आहे. सायंकाळनंतर ही भटकी कुत्री दुचाकीस्वार यांच्या मागे लागतात. अनेक वेळा दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीच्या कपड्यांना ही पकडतात. यात दुचाकीवरील दोघेही कोसळून अपघाताचा प्रसंग निर्माण झाले आहेत. त्यामुळे येथील भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताच्या अनुषंगाने बुधवारी नगराध्यक्ष दालनात बैठक होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा