*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम वृत्तबद्ध कविता*
*लज्जित झाली धरती*
———————————————
*वृत्त : लवंगलता*
ढगात लपला रविकर आला हळूच क्षितिजावरती
राजस त्याचे रूप पाहुनी लज्जित झाली धरती
नभात जमले कृष्णमेघ अन दिशा हरवूनी गेली
दर्शन झाले अवघड त्याचे निशा गडद का झाली
सुवर्णकांती रंगित किरणे अंगावरुनी झरती
राजस त्याचे रूप पाहुनी लाज्जित झाली धरती
तेजस्वी तो भास्कर सुंदर तळपत आहे भुवनी
प्रसन्न त्याची प्रभा पाहुनी अधिर झाली अवनी
दर्शन त्याचे घडता मग ते प्रेमभाव मोहरती
राजस त्याचे रूप पाहुनी लाज्जित झाली धरती
तिच्या मनातील भाव गुलाबी नभी उमलुनी येती
तऱ्हे तऱ्हे च्या रंगांमधुनी जणू प्रकटुनी जाती
तिच्या कौतुके विहंग सारे मंजुळ गाणी गाती
राजस त्याचे रूप पाहुनी लाज्जित झाली धरती
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण पुणे
9130861304
केवळ नावासहितच पुढे पाठवावे
@ सर्व हक्क सुरक्षित
30.06.2023
*संवाद मिडिया*
⭕ _*प्रवेश सुरु ! प्रवेश सुरु !! प्रवेश सुरु !!!*_ ⭕
डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ….
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी, मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट, दापोली.*
(संलग्न मुंबई विद्यापीठ, मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)
*शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू….*
https://sanwadmedia.com/99114/
*👉हॉटेल मॅनेजमेंट (Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
आजच आपला प्रवेश निश्चित करा.
📚 वैशिष्टये 📚
▪︎ १०० % प्लेसमेंट.
▪︎५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪︎ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
*पत्ता – ता.दापोली , जि. रत्नागिरी*
📱संपर्क क्रमांक :
*9420156771 / 7057421082 / 9028466701 / 9527873432*
*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99114/
———————————————-