*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य तथा लालित्य नक्षत्र वेल समूह प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर लिखित अप्रतिम लेख*
*सायकल आणि बालपणीच्या आठवणी*
बालपणी “चल मेरे घोडे टुक टुक टुक” सारखंच सायकल म्हणजे राजस स्वारी… राजस एवढ्यासाठीच की त्याकाळी सायकल असणे म्हणजे सुद्धा प्रतिष्ठेचं असायचं…शाळेत सायकल आणणारा श्रीमंतांचा मुलगा असायचा. एका वर्षाचा शाळेचा गणवेश सहित खर्च पाचशे रुपयात भागायचा तिथे आठशे हजार रुपयांची सायकल कोण घेणार..? पण कर्मधर्म संयोगाने वडील नेहमी सायकल वापरायचे; त्यामुळे त्यांची सायकल अधूनमधून चालवायला मिळायची. त्यामुळे अगदी तिसरीत असतानाच ढेंगी (मधल्या त्रिकोणात पाय घालून पॅडल मारणे) सायकल चालवायला शिकलो. गरजेचा बाजारहाट सुद्धा ढेंगी सायकल चालवत करायचो.
सर्व सायकल प्रेमींच्या आवाक्यातील सायकल म्हणजे हिरो… सर्वात कमी किंमतीत ती एकच मिळायची… ॲटलास, हर्क्युलस या क्वचित कुणाची दारी असायच्या. माझ्या वडीलांनी आपली हर्क्युलस सायकल घेऊन काहीवेळा देवगड सावंतवाडी असा साधारणपणे दीडशे किलोमिटर प्रवास केलेला देखील आठवतो. कदाचित तीच सायकलची आवड माझ्याही नसानसात भिनलेली होती. कधी शेताच्या बांधावरून कसरत करत सायकल चालवणे, पुढचे चाक उचलत मागच्या चाकावर सायकल फिरवणे, वेगात जात ब्रेक मारून मागचे चाक जागच्या जागी स्टंट करून वळण घेणे, दुसऱ्याला झलक देऊन जाणे असे प्रकार नित्याचेच असायचे…तर कधी सायकल शर्यती…! सायकल म्हणजे बालपणी हौस आणि मोठेपणा मिरविण्याची वस्तू…!
शाळेत, ज्युनियर कॉलेज मध्ये असताना सुद्धा नवीन सायकल कधीच कोणी घेऊन दिली नव्हती. दीडशे ते अडीचशे एवढीच किंमत देण्याची आमची हिंमत…! त्यामुळे सायकल भाड्याने देणारे दुकानदार वर्षभर वापरलेली सायकल कधी कमी किंमतीत विकणार याची विचारपूस करून मग ती वापरलेली सायकल विकत घ्यायची. ती जुनी सायकल घेण्यासाठी सुद्धा घरात महिनाभर कौल लावावा लागायचा. मग कधीतरी मूड नुसार प्रसाद व्हायचा अन् पैसे मिळायचे… सायकल आणताच तिला नटवण्याचा कार्यक्रम मोठा असायचा… धुवून पुसून, कुठे रंग गेला तर काळा रंग स्वतःच निष्णात पेंटर असल्याप्रमाणे लावणे… पावसात गंज येईल म्हणून पावसाच्या पूर्वीच स्टीलची रिंग, ताड्या, हॅण्डल आदी पिवळे पॉलिश लावून चकचकीत करून वापरायचो. मग कॉलेज अगदी तीनशे मिटरवर असूनही सायकलने जाणे क्रमप्राप्त…! शिवकालीन रांगणागड किल्ला चढायला देखील नारुर गावापर्यंत आमची एनसीसीच्या विद्यार्थ्यांची पहाटेची ३० कि.मी. सफर सुद्धा सायकलनेच झाली होती. नारूर गावातील मंदिराजवळ सायकली लॉक करून रांगणागड चढलो… गड चढतानाचा कड्यावरून चालण्याचा अनुभव खतरनाक होता.. एका बाजूला कड्याची उंच निसरड अन् दुसऱ्या बाजूस खोल दरी, चालण्याची पायवाट केवळ फुटभर रुंदीचीच… सायंकाळी उशिरा रांगणागड उतरून जवळपास ३० कि.मी.चा येतानाचा प्रवास करून त्याच ऊर्जेने सायकल चालवित सावंतवाडीत आलेलो तो क्षण अविस्मरणीय…!
सावंतवाडी ते रेडी असा मित्राच्या गावी जायचा प्रवास तर कित्येकदा सायकलने व्हायचा… कारण सुद्धा तसंच होतं…
एसटी प्रवासासाठी आठ दहा रुपये देणार कोण..? हाच मोठ्ठा प्रश्न असायचा…
मग वाट कुणाची पहायची…!
“चल मेरी राणी” म्हणत सायकलने सुसाट सुटायचं…
सायकलच्या कॅरीयरवर बसवून भर पावसात डबल सीट फिरण्याची तर मजा काही औरच असायची… मागे कोण बसलंय यावर सुद्धा ठरायचं म्हणा…!
पण, एका हातात छत्री दुसऱ्या हातात सायकलचा हॅण्डल… मोती तलावाच्या काठावर पावसात फिरताना वाऱ्याने छत्रीचे तिर उलटे फिरायचे…तेव्हा तर सायकल सांभाळू की छत्री काहीच समजत नसे…मग काय..?
शेवटी सायकल प्रिय… छत्री द्यायची सोडून देवाच्या भरवश्यावर वाऱ्यासोबत..!
वाऱ्या बरोबर छत्रीसुद्धा जायची गटांगळ्या खात…त्याला बिलगून, घट्ट मिठी मारून…जणू त्याची प्रेयसीच असल्यासारखी…!
कधी कधी वेगाची नशा धोका द्यायची…सायकल सहित चिखलाची सैर व्हायची… तर कधी रस्त्यावरच्या खड्यांवर सरकून सायकल धरणीला आलिंगन देत धरतीचे मुके घ्यायची… अन् आम्ही ढोपर नि कोपर सांभाळत उभे.. माडासारखे स्तब्ध…!
सायकलला काही लागलं तर नाही ना ! याच विवंचनेत…
हात दिला की ती उठायची अन् मी उडी मारून सीटवर स्वार होताच पुन्हा पळू लागायची…
“मला काही लागलंच नाही…” या अविर्भावात…!
उन्हाळ्यात जांभळं डवरलेल्या जांभळीच्या झाडासारखा काळाकुट्ट उन्हात तापलेला डांबरी रस्ता असो वा खाचखळगे असलेला गुलमोहराच्या फुलांसारखा तांबडा रस्ता…माझी सायकल कधी थांबलीच नाही… ती उधळत असायची घोड्यासारखीच पण, चारा पाणी काहीही न घालता…!
नेहमीच सायकल तिच्या नि माझ्या सोबत यायची…एका बाजूस सायकल नि दुसऱ्या बाजूस ती… चोरून चोरून आमच्या गप्पा ऐकायची..अन् आमच्या भेटीची साक्षीदार व्हायची..भेटीचा आनंद घ्यायची.. चालत फिरायला सुद्धा खुश असायची…
पण,
दिवस पालटले…
अन् स्कूटर दारी आली… बऱ्या वाईट दिवसात सोबत केलेली गरीब बिचारी सायकल एकटीच ओसरीवर धूळ खात उभी राहिली..!!
© दीपक पटेकर {दीपी}
८४४६७४३१९६
*संवाद मीडिया*
*-💫🐏-🐓–-🐄-🐃– ✴️
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते*❤🩹
✴️ *मान्सून ऑफर* ✴️
*माय कॅल गोल्ड 24* & *माय मिन मिनरल* पावडर *माय लिवो टॉनिक*
*मोफत*
https://sanwadmedia.com/98343/
फक्त दुधाळ जनावरेच नाही तर कोंबडीच्या पिल्लांपासून,शेळी – बकरे व इतर जनावरांनाही लिव्हर टॉनिक, लिव्हर टॉनिक कमीत कमी एक दीड महिन्याच्या अंतराने आठ दिवस सतत वापरल्यास जनावरांच्या शरीरात Metabaiological बदल होत असल्याने चारा,खाद्यातून किंवा खाद्यावर बुरशी( Tocxic) आल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊन आपण दिलेले खाद्य 100% अंगी लागत नाही त्याचा परिणाम आपल्या व्यावस्यावर होतो. याचा विचार करून *मैत्रेय ऍग्रो & वेट केअर* कंपनीने शेतकऱ्यांना माय कॅल गोल्ड 24 आणि माय मिन ( मिनरल्स) वर *माय लिवो टॉनिक* मोफत द्यायचे ठरविले आहे. त्याच बरोबर माय लिवो टॉनिक फक्त *MRP ₹ १००/-* मध्ये २००मिलि पॅक बाजारात उपलब्द केले आहे.
मैत्रेय ऍग्रो & वेट केअर च्या कोणत्याही प्रॉडक्ट्स च्या *गुणवत्ते* बाबत *पशुवैदेकीय अधिकाऱ्यांचा* सल्ला घ्यावा.
✴️ उत्पादने.
*Mai Cal X gel माय कॅल एक्स जेल*
👉.. 300ml सिंगल डोस..
गाय / म्हैस विण्यापूर्वी 6-12 तास अगोदर आणि विल्या नंतर 6 – 12 तासानंतर.अशक्त आणि उठवणीस आलेल्या जनावरांना.
*वाजवी किंमत रु 175/-*
*Mai Min Powder*+
मिनरल अँड व्हिटॅमिन—– ( मेथो चिलटेड ).🐃🐄🦌
👉 भरगोष वाढ, फँट मध्ये वाढ,वेळेवर गाभाला जाने आणि जनावर तंदुरुस्तची खात्री.
*🐮भरगोष दूध वाढीसाठी🥛*
*👉माय – कॅल गोल्ड 24* 🎯
Mai Cal Gold 24 ( कॅल्शियम लिक्विड)
*👉माय- ग्लुको सिरप* .. Mai Gluco Syrup.
त्वरित पाना सोडणे, 🐄 – लुळेपणा नाहीसा, दुधात वाढ, अंडी देण्याचा कालावधीत वाढ, कोंबडी एकमेकास बोचत नाहीत,🐓 नेहमी फ्रेश दिसून येईल.
*👉माय-लिओ टॉनिक*🫀🫁
भरपूर भूक लागणे, भरपूर गाणी पिणे, शुद्ध रक्तपुरवठा, पचनशक्तीत सुधारणा. फँट मध्ये नियमित पणा.
*👉माय सॉल्ट लिक्स* चाटण विटा
जनावर माती,दावी खात नाहीत, पचनक्रियेत सुधारणा सोबत कॅलसियम आणि इतर घटक
*👉माय- एम बी प्लेक्स* बी कॉम्प्लेक्स सिरप 💧🐓
( अँटी ट्रेस)
जनावर नेहमी फ्रेश,कोंबडी – वासरे – बकरे भरघोस वाढ, उष्णनेतेचा त्रास होत नाही. दुधाळ गायीना उष्णेतेचा त्रास न होता दुधात नियमितता.
*–👌– Mai Prozyme –👌*🐐🐃☘️
👉 बकरे / वासारे वजनात वाढ,
👉सर्व जनावरांची उत्तम पचणक्रिया
👉दुध उत्पादनात नियमितता.
*✅सर्व मेडिकल आणि पशु खाद्य दुकानातून उपलब्ध*
कोकणातील शेतकऱ्यांना दर्जेदार उत्पादने आणि मोठी सवलत देणारी, शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असणारी एकमेव स्थानिक कंपनी…
*मैत्रेय ऍग्रो अँड वेट केअर*
*रावराणे.*
*📲9987703088*
*📲7977602845*
🌎 Visit: www.mvetcare.com
*Advt link*
https://sanwadmedia.com/98343/
———————————————-