You are currently viewing तुळशीच्या पानावर रांगोळीतून साकारले विठ्ठलाचे रूप

तुळशीच्या पानावर रांगोळीतून साकारले विठ्ठलाचे रूप

मालवण

मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमधील इयत्ता दहावीत शिकणारा कु. पार्थ साईनाथ मेस्त्री याने आषाढी एकादशीच्या निमित्ताने ३ × १.५ सेंटीमीटर आकाराच्या तुळशीच्या पानावर श्री देव विठ्ठलाची सुंदर आकर्षक रांगोळी साकारली आहे. अवघ्या १८ मिनिटात साकारलेली ही रांगोळी सर्वांच्या पसंतीस उतरत आहे.

भंडारी हायस्कुलचा विद्यार्थी पार्थ मेस्त्री हा उत्तम चित्रकार व रांगोळीकार असून लहान वयातच त्याने आपल्या कलेची प्रतिभा दाखवली आहे. विविध स्पर्धामध्ये पार्थ याने सुंदर अशा रांगोळ्या काढून पारितोषिकेही मिळविली आहेत. आषाढी एकादशी निमित्त त्याने तुळशीच्या पानावर विठ्ठलाची रांगोळी साकारली आहे. रांगोळी द्वारे अत्यंत बारीक कलाकूसर यामध्ये पार्थ याने केली असून ही रांगोळी सर्वांच्या पसंतीस उतरली आहे. ही रांगोळी पार्थने अवघ्या अठरा मिनिटात रेखाटली असून हा एक वेगळा प्रयत्न म्हणावा लागेल. पार्थने ही रांगोळी साकारतानाचे छायाचित्रण करून हा रेकाॅर्ड गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डच्या अधिकृत वेबसाईटवरही पाठविला आहे.

कुमार पार्थ मेस्त्री याचे भंडारी हायस्कूल मालवणचे मुख्याध्यापक एच बी तिवले ,तसेच संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर, व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा