*”जय हरी विठ्ठल”*
भीमा कांठी हरी
दिंडी वारी चाले
भक्तां ओठी आले
विठू नाम
-१-
विठू नामा मध्ये
गोडी अमृताची
स्वर्ग सुख साची
भागवता
-२-
जाती धर्म पंथ
भेद सारे गेले
नर नारी आले
समभाव
-३-
इथे देव जागा
स्वप्न पूर्ती होई
वृंदावन डोई
नामघोष
-४-
आयुष्याच्या अंती
राहो भक्ती धागा
तव पदी जागा
दे मजला
-५-
-बाबू फिलीप डिसोजा कुमठेकर
यमुनानगर निगडी पुणे-४११०४४