*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर (मिशिगन अमेरिका) लिखित अप्रतिम लेख*
*रंगभूमी*
“मला नाटके बघायला आवडत नाही” असे म्हणणारा माणूस क्वचितच असेल बहुधा.
कारण आपलं आयुष्य हेच मुळी तीन अंकी नाटक आहे.तेच आपण नाटक ह्या साहित्य प्रकारात रंगभूमीवर पहात असतो आणि म्हणूनच त्यात प्रेक्षक रंगून जातो.
*It’s a performing art* एका मर्यादित* *काळात एखाद्या घटनेवर आधारित काही* *पात्रांना घेऊन ती घटना प्रेक्षकांपुढे सादर* *करणे आणि त्यांना खुर्चीला खिळवून* *ठेवण्याची कला म्हणजे नाटक*अशी मी
नाटक या साहित्य प्रकाराची व्याख्या करेन.
नाटक हा हेन्री इब्सेनने आणलेला मूळ इंग्रजी साहित्य प्रकार विष्णुदास भावे यांनी १८४३ साली *सीता स्वयंवर* हे नाटक लिहून मराठीत रुजू केला. त्याची पाळे मुळे रुजण्यास जवळ जवळ तीन तपांचा काळ लोटला,त्यानंतर मात्र मराठी नाटक फोफावत गेले.नाटकाचा हा सुरवातीचा काळ विशेष करून पौराणिक नाटकांचा होता.कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, अण्णासाहेब किर्लोस्कर
यांनी शाकुंतल,स्वयंवर,सौभद्र वगैरे पौराणिक नाटके रंगभूमीवर आणली. ह्या नाटकांचे वैशिष्ठ्य म्हणजे ही सगळी नाटके संगीत होती.
पुढे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर,गोविंद बल्लाळ देवल आदि प्रभृतींनी मूकनायक,शारदा अशी सामाजिक संगीत नाटके रंगभूमीवर आणली.
समाज प्रबोधन करणे हा त्यातील मुख्य हेतू होता.श्रीपाद नारायण राजहंस उर्फ बालगंधर्व
हे १९०५ साली किर्लोस्कर नाटक मंडळीत दाखल झाले आणि त्यांच्या गायनाने नाट्यप्रेमी मंडळींना अक्षरशः वेड लावले. संगीत नाटकांचा तो सुवर्ण काळच होता.
साधारण १९५० नंतर मो.ग.रांगणेकर यांच्या नाट्य निकेतन या संस्थेने प्रेक्षकांना कुलवधू,एक होता म्हातारा,आंधळ्यांची शाळा अशी सामाजिक नाटके दिली आणि त्यातील संगीताचे स्वरूपही बदलले. मास्टर अविनाश आणि ज्योत्स्नाबाई भोळे यांच्या सुमधूर गायनाने प्रेक्षकांना वेड लावले.
हळूहळू संगीत नाटकांचे महत्व कमी होऊन वि.वा शिरवाडकर,वसंत कानेटकर,मधुसुदन कालेलकर वगैरे लेखकांनी
बॅरिस्टर,नटसम्राट,हिमालयाची सावली,अश्रूंची झाली फुले या सारखी गद्य नाटके रंगभूमीवर गाजवली. मधूनच ययाती देवयानी,कट्यार काळजात घुसली अशी संगीत नाटकेही येत होतीच आणि प्रेक्षकांच्या ह्रदयाचा ठाव घेत होती.
आजही नाटकांचे युग चालूच आहे. आधुनिक काळातील लिव्हिन रिलेशनशिप,डिव्होर्सचे वाढते प्रमाण, पुनर्विवाह वगैरे सामाजिक प्रश्नांवर आधारित नाटके लिहीली जातात,त्याचे अनेक प्रयोग होतात!रसिकांना आवडतात. आज गाजत असलेली
चारचौघी,आमनेसामने खरं खरं सांग अशी नाटके हे त्याचे उदाहरण आहे.
काळ बदलला तसतसा नाटकाचे नेपथ्य,दिग्दर्शन,पात्रांची रंभूमीवरील हालचाल,ह्यात खूपच फरक पडत गेला. एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकातील पुर्वाधापर्यंत नाटक हे केवळ मनोरंजन वाटत होते,परंतु आधुनिक काळात मनोरंजनासोबत त्यात वास्तवताही अधिक जाणवते.
आचार्य अत्रे यांच्या *तो मी नव्हेच* या नाटकासाठी प्रभाकर पणशीकरांनी फिरत्या रंगमंचाची प्रेक्षकांना ओळख करून दिली.
सुखांतिका,शोकांतिका,विनोदी असे नाटकांचे प्रकार आहेत. राम गणेश गडकरी यांनी एकच प्याला हे नाटक लिहून शोकांतिका कशी असते ते दाखविले.प्र.के.अत्रे, पु.ल.देशपांडे हे साहित्यिक तर विनोदाचे बादशहा! मोरूची मावशी,ब्रम्हचारी ही अत्र्यांची नाटके,तर तुझे आहे तुजपाशी,सुंदर मी होणार,ती फुलराणी ही पुलंची नाटके.
ह्यातील विनोदांतून समाजातील व्यंगे हे लेखक दाखवितात.
मी वर म्हटल्याप्रमाणे नाटक ही प्रेक्षकांसमोर सादर करण्याची कला असल्यामुळे
नाटकातील पात्रे रंगविणार्या नाट्यकर्म्यांची जबाबदारी फार मोठी असते. मानापनातील धैर्यधर असो,सौभद्रातील कृष्ण असो ,तुझे आहे तुजपाशीतील काकाजी असो किंवा नटसम्राटातील आप्पा बेळवलकर असो त्या त्या पात्राचे व्यक्तीमत्व नटाला त्याच्या वाणीतून,देहबोलीतून,त्याच्या वेशभूषेतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावयाचे असते. त्या भूमिकेत एकरूप झाल्याशिवाय हे अवघड आहे.
नाटक ह्या विषयावर लिहावे तितके थोडेच आहे,तेव्हा वाचकांना वाचण्याचा कंटाळा येण्यापूर्वी थांबणे बरे!
अरूणा मुल्हेरकर
मिशिगन
२७/०६/२०२३
*संवाद मिडिया*
*नोकरी👨🏻💻, व्यवसाय👨🏻💼 करता-करता शिक्षण घ्या📚, आणि पदवी मिळवा…👨🏻🎓*
_🤩होय…!! आता पदवीचे👨🏻🎓 शिक्षण *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* यांच्या माध्यमातून झाले आहे सोपे…🤗_
*🔖प्रवेश सुरू..!! सन २०२३-२४ वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू…📑*
_प्रत्यक्ष या…🏃🏻♀️ आणि आजमावून पहा *✡️यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, सावंतवाडी✡️* मुख्य प्रवेश केंद्राचे वेगळंपण…!!🤗_
https://sanwadmedia.com/99691/
*🛑यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्फत उपलब्ध शिक्षणक्रम*
◾बी. ए. / बी. कॉम
◾एम. कॉम
◾एम. ए. (मराठी)
◾एम. ए. (हिंदी)
◾एम. ए. (इंग्लिश)
◾एम. ए. (अर्थशास्त्र)
◾एम. ए. (लोक प्रशासन)
◾एम.बी.ए. (HR, Fin, Mkt, Mnfg)
◾रूग्ण सहायक(पेशंट असिस्टंट)
*🔸टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषयक मार्गदर्शन उपलब्ध*
*📌१० वी किंवा १२ वी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणासाठी संधी…🤩*
*♦️स्पर्धा परीक्षा (उदा. एमपीएससी, युपीएससी) साठी उपयुक्त व सक्षम शिक्षण*
*♦️कोर्स फी मध्येच अध्ययन साहित्य उपलब्ध*
*🔖त्वरित नावनोंदणी करा..!📑*
*♦️आरपीडी ज्युनि. कॉलेज स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रवेशासाठी आजच संपर्क करा…📲*
*🎴आमचा पत्ता:-*
*♦️मुख्य प्रवेश कार्यालय👇*
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, आर. पी. डी. ज्युनि. कॉलेज गेट नं. २समोर, आनंदी कॉम्प्युटर शेजारी, सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी
*📲संपर्क:-*
*🔸तुषार वेंगुर्लेकर*
8605992334 / 9422896699
*🔹राहुल भालेराव*
8856993826
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/99691/
—————————————————