कणकवली गडनदी रेल्वे ब्रीजखाली छापा टाकून गांजासह दोन इसम ताब्यात – पोलीस निरीक्षक संदिप भोसले
सिंधुदुर्गनगरी
कणकवली पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार कृष्णा केसरकर यांना दि. 27 जून 2023 रोजी त्यांच्या बातमीदारामार्फत कणकवली गडनदी रेल्वे ब्रीजखाली काही इसम गांजाची विक्री व सेवन करीत असल्याची बातमी मिळाली. सदर बातमीची खातरजम करून कारवाई करण्याचे नियोजन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग करुन सदर ठिकाणी छापा टाकून दोन इसमांसह 1.310 किग्रॅ. वजनाचा गांजा सदृश्य पदार्थ किंमत सुमारे 39,000/- रू. तसेच चिलीम, दुचाकी, मोबाईल हँडसेट, रोख रक्कम असा सुमारे 1लाख 6 हजार रु किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून ताब्यात घेतलेल्या दोन इसमांना पुढील कारवाईकरीता कणकवली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली.
हजर असलेल्या तीन इसमापैकी एक इसम पोलीसांची चाहूल लागताच अंधाराचा व झाडी झुडपांचा फायदा घेवून पळून जाण्यास यशस्वी झाला.
जिल्ह्यायामधे अंमली पदार्थ जवळ बाळगणारे, त्याची विक्री करणे व त्याचे सेवन करणे अशा इसमांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिलेले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधिक्षक नितीन बगाटे हे प्रत्येक पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचा दरमहा आढावा घेतात.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदिप भोसले, सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, पोलीस उप निरीक्षक रामचंद्र शेळके, सपोफी गुरुनाथ कोयंडे, पोलीस हवालदार आशिष गंगावणे, राजेंद्र जामसंडेकर, प्रकाश कदम, कृष्णा केसरकर, किरण देसाई, चंद्रकांत पालकर, रवी इंगळे यांच्या पथकाने पार पाडली.