बांदा
दरवर्षी २६ हा जून आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने बांदा पोलिस ठाणे व जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नंबर एक यांच्यावतीने अंमली पदार्थ विरोधी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
बांदा केंद्रशाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री निलेश मोरजकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे दीपक प्रज्वलन बांदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस .जी .काळे यांच्या हस्तेज्ञ दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी साहेब पोलीस निरीक्षक काळे सर यांनी बोलताना सांगितले की अंमली पदार्थ सेवन व त्याचे दुष्परिणाम बालपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी शाळा पातळीवर या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चित्रकला स्पर्धेत पहिली ते चौथी व पाचवी ते सातवी या दोन्ही गटातून दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी शाळा मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर केंद्र प्रमुख संदीप गवस, पोलिस हवालदार सिद्धार्थ माळकरी,तातू कोळेकर, राजेंद्र बरगे श्री सावंत आदि मान्यवर उपस्थित होते.
या चित्रकला स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे लहान गट पहिली ते चौथी-प्रथम तनिष्का संदीप देसाई, द्वितीय दुर्वा दत्ताराम नाटेकर, श्रृती उल्हास हळदणकर, उत्तेजनार्थ मृण्मयी निलेश पंडित मोठा गट पाचवी ते सातवी प्रथम -सर्वेक्षा नितीन ढेकळे, द्वितीयत्रिशा दिपांकर गावडे, तृतीय पुर्वा हेमंत मोर्ये उत्तेजनार्थ भार्गवी निवृत्ती गवस
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक उपशिक्षक जे.डी.पाटील तर आभार केंद्रप्रमुख संदीप गवस यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक व पोलिस कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.