देवगड –
तांबळडेग ग्रामसेवा संस्थेच्या माध्यमातून सर्वतोपरी कार्य करण्याचा नेहमी प्रयत्न केला जातो. अलिकडे शासकीय मत्स्यव्यवसाय शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वितरण आणि शासनाकडून प्राप्त झालेली पाठ्यपुस्तके संस्थेचे अध्यक्ष तुकाराम तथा नाना मोंडकर, मुक्तद्वार वाचनालयाचे अध्यक्ष दिगंबर येरागी, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान तथा भाऊ सरवणकर, जेष्ठ नागरिक संघाचे नरेंद्र राजम, देवानंद केळुस्कर , शालेय संघाचे अध्यक्ष राजेंद्र उपनेकर, या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थींना सन्मानित करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते सत्यवान सरवणकर यांनी आपण ज्या शाळेत शिकलो. त्याचं ऋण म्हणून शाळेला दहा खुर्चीच्या देण्याचे जाहीर केले. यावेळी शासनाच्यावतीने दारिद्र्य रेषेखालील एका विद्यार्थ्याला गणवेश देण्यात आला. तर उर्वरित विद्यार्थींना तांबळडेग ग्रामसेवा संस्थेच्या माध्यमातून देण्यात येतील संस्थेचे अध्यक्ष तुकाराम मोंडकर यांनी देण्यात येतील अशी ग्वाही दिली. तसेच टीजीएस किलबिल या व्हाट्सअप समुहात सहभागी होण्याचे आवाहन करून तसेच संस्थेकडून वह्या वाटप करण्यात येणार असल्याचे आश्वासीत केले. यावेळी नरेंद्र राजम, दिगंबर येरागी आदींनी आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी पालक, अंगणवाडी शिक्षिका ,सेविका , मदतनीस उपस्थित होते.