You are currently viewing पहिला पाऊस

पहिला पाऊस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पहिला पाऊस* 

 

पाऊस आला पहिला

थेंबा थेंबांच्या स्पर्शाने

अंगण झाले ओले

अन्  मृदगंध दरवळला

 

पाऊस आला पहिला

सोबती वारा घेऊन आला

अन् गारव्याचा अलगद

स्पर्श अनुभवला

 

पाऊस आला पहिला

आकाशातून धरतीला

प्रितीचा तुषार

भेट देऊन गेला

 

पाऊस आला पहिला

ओढ लागली मनाला

झोकले तनाला

पहिल्याच पावसात

भिजण्याचा आनंद लुटला

 

पाऊस आला पहिला

मंद-धुंद, गंध-सुगंध

स्पर्श-स्वाद,आनंद-परमानंद

सारे काही देऊन गेला

 

पाऊस आला पहिला

पाऊस आला पहिला

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे .*

7588318543.

प्रतिक्रिया व्यक्त करा